Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राणी चांदबिबीच्या वंशजांचं ‘त्या’ विषयावरुन आदित्य ठाकरेंना पत्र; वाचा, काय म्हटलेय पत्रात

मुंबई :

Advertisement

ज्यांनी महाराष्ट्रात मुघलांना प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न केले अशा शूर-वीर अहमदनगरच्या राणी सुलतान चांदबीबी यांच्या वंशज असलेल्या आणि स्पॅन महिला अ‍ॅग्रो टुरिजम संस्थेच्या अनिसा शेख यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहीत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Advertisement

सध्याच्या घडीला कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील घटकांना मोठा फटका बसला आहे. नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेला बसलेला फटका पुन्हा एकदा कोरोना अशा या दुहेरी संकटामुळे आघातामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने विविध रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. याकरिता पर्यटन मंत्री ठाकरे यांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.

Advertisement

नवी मुंबईमधील निसर्गाने संपदेने परिपूर्ण अशा खारघर हिलवर अनिसा शेख यांचा अ‍ॅग्रो टुरिझम प्रकल्प आहे. याठिकाणी वेगवगेळ्या प्रकारच्या वनस्पती, वृक्षलागवड तसेच निसर्गाच्या रक्षणासाठी शेख या प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या घडीला विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास न करता पर्यटनाला उभारणी देण्याची गरज असल्याचे मत अनिसा शेख यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply