Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

चारचाकी चालवणार्‍यांनो इकडे द्या लक्ष; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, ‘ती’ गोष्ट गाडीत नसल्यास…

दिल्ली :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून ऑटो क्षेत्रासाठी केंद्र सरकार सातत्याने विविध निर्णय घेत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून सदर निर्णय 1 एप्रिलपासून पाळणे हे बंधनकारक असणार आहे.

Advertisement

केंद्र सरकार कारमध्ये फ्रंट एयरबॅग अनिवार्य (Airbag mandatory) करणार आहे. आता 1 एप्रिलपासून प्रत्येक गाडीमध्ये ड्रायव्हरसह को-पॅसेंजर साईडलाही एयरबॅग देणं अनिवार्य असणार आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने याबाबत कायदा मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला होता, त्याला मंजूरी देण्यात आली आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून सरकार कार ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने काम करत आहे. याचाच परिणाम म्हणजे आधीच्या तुलनेत आता कारमध्ये अधिक सेफ्टी फीचर्स देण्यात येतात, जे कार चालवणाऱ्यासह, इतर प्रवाशांसाठीही महत्त्वाचे आहेत. त्यासाठी सरकार आग्रही असून आता या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे.

Advertisement

न्यूज 18ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांत यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात येईल. 1 एप्रिल 2021 आणि त्यानंतर बनलेल्या कारमध्ये दोन फ्रंट एयरबॅग आवश्यक असणार आहे. नोटिफिकेशननुसार, सध्याच्या मॉडेलसाठी नवा नियम 31 ऑगस्टपासून लागू केला जाईल. प्रस्तावित अंतिम मुदत जून 2021 होती, जी आता वाढवण्यात आली आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply