Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर; वाचा, आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडला प्रकार

दिल्ली :

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा तेजी दिसून येत आहे. गुरुवारी, कच्च्या तेलाने 2 वर्षात सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड अंदाजे 8.8 टक्क्यांनी वाढून 67 डॉलर प्रति बॅरल पातळी गाठला. आज ती पातळी वाढून 67.50 वर गेली.

Advertisement

त्याचबरोबर WTI क्रूड देखील 4.2 टक्क्यांनी वाढून 63.83 डॉलर प्रति बॅरल झाला. वस्तुतः गुरुवारी ओपेक प्लस(OPEC) देशांच्या बैठकीत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यास मान्यता देण्यात आलेली नाही. या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Advertisement

तज्ज्ञ म्हणतात की, क्रूडमध्ये आणखी वाढ होऊ शकते, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी वाढू शकतात. सध्या 5 मार्चला पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल 91.17 आणि डिझेल 81.47 रुपये प्रतिलिटर स्थिर आहे.

Advertisement

कच्च्या तेलाची निर्मिती व निर्यात करणा ओपेक आणि त्याच्या भागीदार देशांनी तेलाच्या उत्पादनातील कपातची सध्याची पातळी जवळपास ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे जगातील सर्वात मोठे तेल उत्पादक देश सौदी अरेबिया कमीतकमी एप्रिलपर्यंत दररोज दहा लाख बॅरलची कपात करत राहील. ताज्या कराराखाली रशिया आणि कझाकस्तान तेलाच्या उत्पादनात किंचित वाढ करू शकतात.

Loading...
Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply