Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘तर’ हिरेन मृत्यूप्रकरणाचं सत्य समोर येणार नाही; संजय राऊतांनी सांगितले ‘हे’ लॉजिक

मुंबई :

Advertisement

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर आता धमकीचा देखील तपास एटीएसकडे देण्यात आला आहे.

Advertisement

मुंब्रातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने या प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्याची मागणी केली आहे. दरम्यान यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे.

Advertisement

हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची विरोधक मागणी करत आहेत. एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही, असं सांगतानाच मुंबई पोलीस हा तपास करण्यात सक्षम आहे. आता तर गृहमंत्र्यांनी एटीएसकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

Advertisement

या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी पत्रकार परिषद घेत एक धक्कादाखक खुलासा केला आहे. मनसुक यांना गुरूवारी रात्री कांदिवलीवरून एका तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर ते पोलिस चौकशीसाठी बाहेर गेले आणि परत आलेच नाही. रात्री दहानंतर त्यांचा फोन बंद होता. आम्ही रात्रभर वाट पाहिली परंतू ते सकाळपर्यंत आले नाही. त्यानंतर आम्ही सकाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली, अशी माहिती विमल हिरेन यांनी माध्यमांना दिली.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply