Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय; वाचा, काय म्हणाल्यात शिक्षणमंत्री

मुंबई :

Advertisement

इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा नेमक्या कशा होणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही डोळे लावून बसले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावी व बारावीची परीक्षाविषयी भाष्य केले आहे.  

Advertisement

गायकवाड म्हणाल्या की, राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. यावेळी त्या विधानसभेत बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

Advertisement

आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत याविषयी काही लक्षणीय मुद्दे उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी परीक्षांची माहिती दिली.

Advertisement

दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Advertisement

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून 15 मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परिक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply