Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा

मुंबई :

Advertisement

राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस नेते भाई जगताप तसेच आमदार जयंत आसगावकर यांनी दिव्यांग शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मिळावे अशी मागणी केली होती. 

Advertisement

याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना मुंडेंनी दिव्यांग शाळेतील शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

Advertisement

अधिवेशनानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागांसोबत व्यापक बैठक घेऊन हे अडसर दूर करण्यात येतील. तसेच येत्या दोन महिन्यांच्या आत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येईल असेही मुंडे म्हणाले.

Advertisement

पुढे ते म्हणाले की, राज्य सरकार दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष ज्युनिअर कॉलेज उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असून, याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply