Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी

दिल्ली :

Advertisement

आज आम्ही तुमच्यासमोर एक भन्नाट स्टोरी घेऊन आलो आहोत. दुग्ध उत्पादनात आजवर अनेक नवनवे प्रयोग आपण पहिले असतील. तंत्रज्ञान, व्यवसाय, मार्केटिंगची पद्धत यापलीकडे जाऊन आता थेट गाढवाचे दूधच विकले जात आहे. तसेच गाढवाच्या दुधाची डेअरीही सुरू झालेली आहे.

Advertisement

देशात पहिली गाढवाच्या दुधाची डेअरी सुरु हरियाणात सुरू झालेली आहे.

Advertisement

किती आहे गाढवाच्या दुधाची किंमत :-

Advertisement

दुधाची किंमत प्रती लिटर पाच ते सात हजार रुपये एवढी आहे.

Advertisement

कुठे आहे डेअरी :-

Advertisement

राष्ट्रीय अनुसंधान केंद्र हरियाणा हे देशातील पहिली गाढवाच्या दुधाची डेअरी उभा करत आहेत. हरियानामधील हिसार येथे ही डेअरी उभी करून गाढवाच्या दुधाचा साठा केला जाणार आहे.

Advertisement

कोणती आहे गाढवाची जात :-

Advertisement

हिलानी नावाच्या गाढवाच्या जातीचा या डेअरी साठी उपयोग केला जाणारा असून या डेअरीच्या दुधासाठी १० गाढवाचा समावेश असणार आहे. हे गाढवे गुजरातमधून मागवली गेली आहेत.

Advertisement

असे आहेत या दुधाचे फायदे :-

Loading...
Advertisement

या दुधापासून अनेक महागडे प्रॉडक्ट्स तयार केले जात आहेत. त्याचा वापर हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी , कॅन्सर , ऍलर्जी या आजरांपासून बचाव होतो.

Advertisement

गाढवाचे दूध हे औषधाचा खजाना मानला जातो.

Advertisement

उर्जा आणि शक्तीसाठी या दुधाचा वापर केला जातो.

Advertisement

गाढवांची डेअरीचे प्रोजेक्टचे काम सुरु झालेले आहे. या प्रोजेक्टसाठी तज्ञ मंडळींची टीम नियुक्त झालेली आहे. या टीममधील डॉक्टर अनुराधा भारद्वाज यांनी सांगितलं की, लहान मुलांना अनेक वेळा साध्या दुधामुळे ऍलर्जी होते. पण गाढवाच्या दुधामळे मुलांना कोणताही त्रास होत नाही किंवा कोणताही साईट इफेक्ट होत नाही. या दुधामध्ये अँटी ऑक्सिडंट , तसेच अँटी इंजीन हे तत्व असतात. यामुळे गंभीर आजाराविरोधात लढण्याची क्षमता या दुधातून मिळते. गाढवाच्या दुधापासून अनेक पार्लर चे प्रॉडक्ट तयार केले जात आहेत. लीप बाम, साबण, बॉडी लोशन तयार केले जाते.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply