Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून इम्रानने काढला अंगावरील शर्ट : पहा, रसिकांनी कशी दिली दाद

दक्षिण अफ्रिकेचा फिरकीपटु इम्रान ताहीर हा विकेट घेतल्यानंतर आपल्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखला जातो. मात्र त्यानं नुकत्याच एका सामन्यात विकेट मिळवल्यानंतर अंगावरील टी शर्ट काढत सेलिब्रेशन केलं आणि क्रिकेट रसिकांनी त्याचं चांगलच कौतुक केलं.

Advertisement

पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात मुल्तान सुल्तानकडून खेळणाऱ्या ताहिरने पाकिस्तानी दिवंगत खेळाडूला आपल्या कृतीने आदरांजली वाहिली. त्यामुळे त्याच्या खेळभावनेचं कौतुक होत आहे. इमरान ताहिरचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर चाहते खूपच भावूक झाले आहेत.

Advertisement

ताहिरने ग्लेडिएटर्स संघाचा फलंदाज सॅम अयूबला बाद करताच त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या अंगावरील टी-शर्ट काढला. जेव्हा इम्रानने आपला टीशर्ट उतरविला त्यावर पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ताहिर मुगलचा फोटो होता. याच कृतीने त्याने क्रिकेट रसिकांची मने जिंकली. या सामन्यात इम्रान ताहिरने ४ षटकांत २९ धावा देत २ बळी घेतले.

Advertisement

पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू ताहिर मुगल यांचे कर्करोगाने निधन झाले असून त्याने पाकिस्तानकडून ११२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने ३ हजार २०२ धावा केल्या. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मुगलने बराच काळ प्रशिक्षक म्हणून काम केले. परंतु वयाच्या ४३ व्या वर्षी १० जानेवारी रोजी कर्करोगाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply