Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मग माझ्या नावावर पावती फाडू नका; अजित दादांनी अख्खे सभागृह हसवले, वाचा संपूर्ण किस्सा

मुंबई :

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रवीण दरेकर आणि सभापती रामराजे निंबाळकर यांना कोरोना झाला नाही. तुम्हा तिघांनाही कोरोना होऊ नये, अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून कोरोना झाला, असं म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.

Advertisement

विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत कोरोनासंदर्भात निवेदन देताना अजित पवार (Ajit Pawar) यांची टोलेबाजी पुन्हा एकदा सभागृहाने अनुभवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क लावायला पाहिजे, असं सांगताना ते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे जुने नेते आहेत, असं हसत हसत अजितदादा म्हणाले. अजितदादांच्या हसण्यावर सभागृहातही एकच हशा पिकला. 

Advertisement

फक्त मुख्यमंत्री, प्रविण दरेकर आणि सभापतींना कोरोना झाला नाही, मला कोरोना झाला, देवेंद्र फडणवीसांनाही कोरोना झालाय, तुमची रोग प्रतिकारकशक्ती जास्त असेल किंवा तुमचं जॅकेट पाहून कुठं आत शिरायचं म्हणून कोरोना झाला नसावा काय असेल माहिती नाही, असा चिमटा अजितदादांनी काढला.

Advertisement

‘काही नेते म्हणतात मी मास्क लावतच नाही पण बाकीच्यांना कोरोना झाला तर काय कारायचं?’, असा टोला अजितदादांनी नाव न घेता राज ठाकरेंना हानला.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply