Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर राजीनामा मंजूर; आता वनमंत्री पदासाठी होतेय ‘या’ नावांची चर्चा

मुंबई :

Advertisement

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढला होता. त्यातही आता महाविकास आघाडीकडूनच राजीनाम्यासाठी अंतर्गत दबाव होता. अखेर राठोड यांनी राजीनामा दिला.

Advertisement

आताच हाती आलेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी 28 फेब्रुवारीला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांकडे राजीनामा पाठवण्यात आला. अखेर राज्यपालांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला.

Advertisement

आता वनमंत्री पदासाठी कुणाची वर्णी लागणार?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. आपल्या विभागाचा वनमंत्री व्हावा, यासाठी मुंबई विरुद्ध विदर्भ या 2 विभाग एकमेकांचा अंदाज घेत आहेत. विदर्भात मंत्रीपद देण्याचे ठरल्यास गोपिकिशन बाजोरिया, नितीन देशमुख आणि संजय रायमुळकर यांची नावे चर्चेत आहेत.

Advertisement

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन विदर्भातील एखाद्या आमदाराला राज्यमंत्री पद दिली जाण्याचीही शक्यता सांगितली जात आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply