Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा फटका; भाजप खासदारांनी घेतली ‘ती’ भूमिका

दिल्ली :

Advertisement

कृषी कायद्यांवर केंद्र सरकारने अजूनही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे सरकारचा कोडगेपणा लोकांसमोर आलेले आहे. शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांच्या संख्येतही मजबूत वाढ होताना दिसत आहे. अशातच आता कृषी कायद्यांवरून आक्रमक भूमिका घेणार्‍या भाजपला मोठा झटका बसल्याची बातमी समोर आली आहे.

Advertisement

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आता भाजपामध्येच (BJP) असंतोष वाढत असून, भाजपाचा एक खासदार या कायद्यांचा विरोध करत राजीनामा देणार असल्याचा दावा भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केला आहे.          

Advertisement

राकेश टिकैत यांनी कृषी कायद्यांना विरोध करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत राजीनामा देण्याचा तयारीत असलेल्या या खासदाराचे नाव मात्र जाहीर केलेले नाही. तसेच भाजपाचे जेवढे खासदार आहेत तेवढे दिवस शेतकरी आंदोलन चालेल, असा दावाही राकेश टिकैत यांनी केला.

Advertisement

पश्चिम उत्तर प्रदेश भागातील भाजपाचा कुठलातरी खासदार कृषी कायद्यांना विरोध करत राजीनामा देईल, असा अंदाज आहे. तर काही राजकीय तज्ज्ञांच्या मते राजीनाम्यांची सुरुवात ही पंजाब-किंवा हरियाणामधून होईल.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply