Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर पुजा चव्हाण प्रकरणातील ‘ते’ नगरसेवक समोर; सांगितली संपूर्ण हकीकत

दिल्ली :

Advertisement

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालेले आहे. या प्रकरणात एका भाजप नगरसेवकावर पूजा चव्हाणचा लॅपटॉप लावल्याचा आरोप होता. आणि गेल्या काही दिवसांपासून हे नगरसेवक नॉट रीचेबल होते. आता ते समोर आले असून त्यांनी या प्रकरणाचा खुलासा केला आहे.     

Advertisement

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात घटनास्थळी उपस्थित असणारे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. “पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाइल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही”, असं स्पष्टीकरण धनराज घोगरे यांनी दिलं आहे.

Advertisement

धनराज घोगरे यांच्यावर पूजा चव्हाणचा लॅपटॉप चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर धनराज घोगरे गायब असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर धनराज घोगरे यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले.

Advertisement

पूजा चव्हाण इमारतीवरून खाली पडली तेव्हा मी त्याठिकाणी केवळ माणुसकीच्या नात्याने गेलो होतो. मी तिला उचलून रिक्षात ठेवले. त्यावेळी अरूण राठोड आणि विलास चव्हाण हे दोघेही त्याठिकाणी हजर होते. पूजाला उपचार मिळणे, ही माझी प्राथमिकता होती. मी पूजाच्या फ्लॅटमध्ये जाऊन तिच्या कोणत्याही वस्तूला हात लावलेला नाही, असे धनराज घोगरे यांनी सांगितले.

Advertisement

पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप धनराज घोगरे यांनी चोरल्याचा आरोप बीडच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या संगीता चव्हाण यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी धनराज घोगरे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बीड पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण प्राप्त झालं आहे.

Loading...
Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply