Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता ‘या’ खेळाडूच्याही नावे झालाय ६ बॉलवर ६ सिक्सर मारण्याचा विक्रम

दिल्ली :

Advertisement

भारताचा धडाकेबाज खेळाडू युवराज सिंह आणि दक्षिण अफ्रिकेचा स्फोटक फलंदाज हर्षल गिब्ज यांच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम असून आता या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश झाला आहे.
वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं दणदणीत विजय मिळवला. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड यानं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावले. पोलार्डनं अकिला धनंजय याच्या एका ओव्हरमध्ये हा विक्रम केला आहे.
वेस्ट इंडिजच्या इनिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये पोलार्डनं ही कामगिरी केली असून पोलार्डनं या मॅचमध्ये ११ बॉलमध्ये ३८ रन काढले. पोलार्डनं मारलेले हे सिक्सर एकदम सरळ मारले असून यापुर्वी युवराज सिंहनं इंग्लंडच्या ब्रॉडला ६ सिक्स लगावले होते. त्यानंतर पोलार्डनं तब्बल १४ वर्षांनी या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. दक्षिण अफ्रिकेच्या गिब्जने एकदिवसीय सामन्यात सलग सहा षटकार मारले आहेत. त्यानं २००७ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड विरुद्ध हा रेकॉर्ड केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं रेकॉर्ड करणारा पोलार्ड हा तिसरा खेळाडू ठरला आहे. पोलार्डनं केलेल्या या कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आले. चार विकेट्स पडल्यानंतर त्यानं ही विक्रमी खेळी करत टीमला जिंकून दिले. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Loading...
Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply