Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘म्हणून’ पुन्हा वाढली स्थानिक कांद्याची मागणी; दरातही झाला सुधार

पुणे :

Advertisement

मागील आठवड्यात गुजरातच्या कांद्याची झालेली आवक, हवामानातील बदल आणि लॉकडाऊन लागेल, बाजार समित्या बंद होतील, या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस बाजारात आणला होता. गेल्या काही दिवसांपासून नवा कांदा मार्केटमध्ये यायला सुरू झाल्याने भाव उतरले होते. कांद्याच्या भावाला गेल्या आठवड्यापासून घरघर लागली होती. अशातच गुजराती कांद्याने एंट्री मारल्याने कांद्याचे भाव अजूनच उतरले.  

Advertisement

लॉकडाउनची शक्यता असल्याने मार्केट यार्डात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे आता कांद्याच्या दरात वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक कांद्याला घाऊक बाजारात दर्जानुसार किलोस 25 ते 29 रुपये भाव मिळत आहे. तर, गुजराती कांद्याला 10 ते 15 रुपये भाव मिळत  आहे.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मागील तीन आठवड्यापासून या कांद्याची आवक होत आहे. मात्र, ग्रेव्ही तयार होत नसल्याने हॉटेल विक्रेते हा कांदा खरेदी करत नाहीत. केवळ स्वस्त मिळतोय म्हणून काही ग्राहक खरेदी करतात. सध्या स्थानिक कांद्याचा गरवीचा हंगाम सुरू आहे. पुरंदर, शिरूर, हवेली, खेड, मंचर, राजगुरूगनगर, जुन्नर, दौंड भागातून मार्केट यार्डात कांद्याची आवक होत आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply