Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर : महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

मुंबई :

Advertisement

देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा कणा मजबूत करण्यात मुंबईचा मोठा हात आहे. सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्र आपले नाव काम उज्वल करण्याचा प्रयत्न करत असतो. आता अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने आज देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे एक तरी शहर असायला पाहिजे, असे तुम्हाला वाटत असेल. मात्र या यादीत एकच नाही तर तब्बल 3 शहरे पहिल्या दहात आहेत.

Advertisement

यात 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत बंगळुरू पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या स्थानावर तर अहमदाबाद तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई (सहाव्या स्थानावर), मुंबई (दहाव्या स्थानावर) आहेत.

Advertisement

यात एक जमेची बाजू असली तरीही एक कमीची बाजूही आहे. ती म्हणजे तर दहा लाखाखालील लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील एकही शहर नाही. या यादीत शिमला पहिल्या, भुवनेश्वर दुसऱ्या व सिल्वासा हे तिसऱ्या स्थानावर आहेत.

Advertisement

या सर्वेक्षणासाठी सरकारकडून 14 कॅटेगरी बनवल्या होत्या. त्यात शहराचा शैक्षणिक विकास, आरोग्य सोयी सुविधा, राहण्यासाठी कितपत योग्य आहे, आर्थिक विकासाचा स्तर, ट्रान्सपोर्ट, स्वच्छता, पर्यावरण, रोजगाराची संधी, हरित क्षेत्र, इमारती, प्रदुषण याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. 

Loading...
Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply