Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; ‘अशी’ झाली अध्यक्षांची परिस्थिती

मुंबई :

Advertisement

महाविकास आघाडीत राज्य पातळीवर सर्वकाही आलबेल असले तरीही स्थानीक पातळीवर मात्र सगळं बट्याभोळ आहे. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा अंतर्गत वाद दबक्या आवाजात का होईना, पण समोर येत होते.

Advertisement

मात्र आता बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेकडे चारही सभापतींनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. परिणामी सदस्यांची वाट बघून कंटाळलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा  राजश्री घुले यांनी सभा तहकूब केली. त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत एकट्याने सभा घेण्याचीची वेळ त्यांच्यावर आली.

Advertisement

या संपूर्ण घटनेत विशेष बाब म्हणजे या सभेच्या वेळेत चारही सभापती हे जिल्हा परिषदेत उपस्थित होते. आता एवढे असल्यानंतरही बैठकीला दांडी मारली, यावरून त्यांच्यात थेट वाद नसले तरीही कुरबुर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद स्थायी समितीची मंगळवारी मासिक बैठक होती. या बैठकीवर निधी, मंजूर विकास कामांवरून पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाले. 

Advertisement

समन्वयाचा अभाव असल्याने विकास कामांच्या फाइली प्रशासन, खातेप्रमुख, अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात अडकून पडले आहेत. यामुळे मंजूर कामे कधी सुरू होणार, मार्चअखेर मंजूर खर्च होणार की नाही याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply