Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी’ शिवसेनेची गरज; भिंडेंनी चक्क भाजप नेत्यांसमोरच केले शिवसेना वाढवण्याचे आवाहन

पुणे :

Advertisement

प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू व सूर्यप्रकाशाची जशी गरज आहे, तशीच या देशाला हिंदूस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेनेची गरज आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे काम आपण वाढवूया, असे म्हणत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी चक्क भाजप नेत्यांसमोरच शिवसेनेला वाढवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

सांगली येथे  स्टेशन चौकाचे नामकरण बाळासाहेब ठाकरे करण्यात आले. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा नामकरण सोहळा झाला. या नामकरणाचा कार्यक्रम व जयंतीचानिमित्त झालेल्या कार्यक्रमात तेर बोलत होते.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण देश हिंदूत्वाच्या धारेखाली आणून देशाच्या नोटेवर शिवछत्रपती, संभाजी महाराजांची प्रतिमा छापायची आहे. या गोष्टी शिवसेनेच्या कार्यातूनच होणे शक्य आहे. एका चौकाचे नामकरण करुन उपयोग नाही. संपूर्ण देशात शिवसेनेचे व बाळासाहेबांचे नाव झाले पाहिजे. संपूर्ण देशात शिवसेना उभी करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण् करण्याची धडपड आपण केली पाहिजे. तीधडपड हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. सांगलीत दोनशे ते अडिचशे शाखा का नाहीत. शाखा वाढल्या पाहिजेत. लोकसेवा तत्पर ठेवून शिवसेनेचा प्रवाह अखंडित ठेवायला हवा. पद, पैसा व प्रतिष्ठा शुल्लक असून शिवसेना व त्याचा विचार पुढे नेण्यासाठी धडपडत रहायला हवे. सांगलीतील चौकाचे नामकरण २५ वर्षापूर्वीच व्हायला हवे होते 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Loading...
Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply