Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

पतीच्या इशाऱ्यानंतरही पत्नी करायची प्रियकराला गुपचूप फोन.. यावर काय म्हणाले उच्च न्यायालय

मुंबई : लग्नानंतरच्या अफेअरच्या (Affair after marriage ) एका प्रकरणात केरळ उच्च न्यायालयने (High Court) मोठी टिप्पणी करताना महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पतीच्या इशाऱ्याला न जुमानता पत्नीने प्रियकराला फोन (Phone) केल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने घटस्फोटाचे (Divorce) आदेश दिले. न्यायमूर्ती यांनी निकालात म्हटले आहे की, पतीच्या इशाऱ्याला न जुमानता पत्नीने तिच्या प्रियकराला फोन केल्यास ती वैवाहिक क्रूरता (Marital cruelty) आहे.

Advertisement

काय प्रकरण आहे : वास्तविक, एका पतीने आपल्या पत्नीवर बेवफाईचा आरोप केला आणि कोर्टाकडे घटस्फोटाची मागणी केली. लिव्हलॉच्या रिपोर्टनुसार, या जोडप्याच्या लग्नाच्या काही दिवसांनंतर 2012 मध्ये दोघांमध्ये मतभेद झाले. हा वाद इतका वाढला की काही दिवसांनी पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली.

Advertisement

त्याआधी पत्नीचे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा पतीला संशय होता. पतीनेही दोघांमधील जिव्हाळ्याच्या गोष्टी ऐकल्या होत्या. यानंतर त्याने पत्नीला ताकीद देऊन फोन करण्यास नकार दिला. मात्र असे असतानाही पत्नीने ऐकले नाही आणि प्रियकराला फोन करणे सुरूच ठेवले.

Loading...
Advertisement

पतीने दोघांना फक्त ऑफिसमध्ये भेटताना पाहिले होते. बाहेर दोघांच्या भेटीचा पुरेसा पुरावा त्याच्याकडे नव्हता. पण त्याची बायको एकाच दिवसात अनेक वेळा समोरच्याला फोन करायची. त्यामुळे पती वारंवार वैतागून पत्नीला सावध करत होता. पतीने सांगितले की, पत्नीमुळे त्यालाही  मानसिक तणावाचा सामना करावा लागला.

Advertisement

त्याचवेळी, पत्नीने स्पष्ट केले की ती समोरच्या व्यक्तीला अधूनमधून कॉल करत असे. मात्र कॉल डिटेल्समध्ये वास्तव काही वेगळेच असल्याचे समोर आले. आपल्या निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की, दोघेही तीनदा वेगळे झाले आणि नंतर समुपदेशन सत्रामुळे एकत्र आले. पतीच्या इशाऱ्यानंतर पत्नीने गुप्त कॉल केल्यास ते वैवाहिक क्रूरता मानले जाईल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply