Marathi Film Tarri: अहमदनगर : राष्ट्रीय पारितोषिक विजेता दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे (National award-winning director Mahesh Raosaheb Kale) पुढील महिन्यात नवा चित्रपट घेऊन येत आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन महेश काळे यांनीच केले असून, ‘टर्री’ हा नवाकोरा सिनेमा १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. नुकतेच याचे मोशन पोस्टर लॉन्च झाले असून यामधून प्रेक्षकांना एक अफलातून अनुभव स्क्रीनवर पाहण्यास मिळण्याचे संकेत स्पष्ट होतात. यात ललित प्रभाकर प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार असून सिनेमाचे टीझरही लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. मोशन पोस्टर आल्यापासूनच काळे यांचे चाहतेही सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात हा सिनेमा असल्याचे स्पष्ट झाल्याने तरुणाईने याचे इमेज आणि मोशन पोस्टर सोशल मिडियामध्ये शेअर करण्यास सुरुवात केली आहे. यात ललित प्रभाकर सोबत गौरी नलावडे, शशांक शेंडे, अनिल नगरकर (Actor Lalit Prabhakar, Gauri Nalavde, Shashank Shende, Anil Nagarkar) आदि कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यातील ललितचा राउडी अवतार नक्कीच भावणार असा प्रोडक्शन टीमला विश्वास आहे. सिनेमात ॲक्शन, ड्रामा अन प्रेमाचा तडका एकत्र पाहावयास मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती प्रतिक किशोर चव्हाण आणि अक्षय आढळराव पाटील यांनी केली असून पॅनोरमा स्टुडिओ हा सिनेमा प्रदर्शित करत आहे.
अहमदनगरमधील न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशनमध्ये (Mass Communication at New Arts College, Ahmednagar,) शिक्षण घेत असताना महेश काळे यांच्या ‘रूपया’ लघुपटाने राष्ट्रीय पुरस्कार (short film ‘Rupaya’ won the National Awar) मिळवला होता. तसेच पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ / 15th Pune International Film Festival (PIF) महेश काळे दिग्दर्शित ‘घुमा’ हा चित्रपटही रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या महोत्सवात ऑडियन्स चॉईस अवॉर्ड ‘घुमा’ला मिळाला होता. तसेच राज्य शासनाच्या पुरस्कारावरही ‘घुमा’ ने मोहोर उमटवली होती (‘Ghuma’ won the state government award). ‘घुमा’ने २० पेक्षा अधिक चित्रपट महोत्सवात नामांकन मिळवले होते. भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘घुमा’मुळे महेश काळे यांना राज्यभर ओळख मिळाली होती. ‘टर्री’मध्ये खूप काही नवीन आहे. ॲक्शन, ड्रामा, लव अस सबकुछ आहे. टर्री करणे माझ्यासाठी चॅलेजिंग होते. ‘टर्री’ सिनेमा नक्कीच सर्वांना आवडेल, असे महेश काळे (लेखक-दिग्दर्शक) यांनी म्हटले आहे.