मिलेनिअल्स त्यांचा पैसा ठेवण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत असतात आणि भांडवली बाजार हा त्यांच्या गुंतवणुकींसाठी एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून उदयाला आला आहे. अर्थात, बाजाराबद्दलच्या ज्ञानाच्या अभावामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम स्टॉक किंवा पोर्टफोलिओ निवडणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. जेनझेड आणि मिलेनिअल्स नेहमीच गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर्सच्या भवितव्याबाबत सल्ल्याच्या शोधात असतात. एंजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी सांगतात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे स्टॉक विश्लेषणाचा आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे आणि या मार्गात मानवी चुकीची संभाव्यता नाहीशी होते व डेटा ड्रिव्हन नियमांच्या आधारे गुंतवणुकीचे पर्याय निवडण्याचे निर्णय केले जातात. म्हणूनच तरुण गुंतवणूकदार त्यांचे गुंतवणुकीबाबतचे निर्णय, नियमाधारित गुंतवणुकीसारख्या खात्रीशीर व कार्यक्षम यंत्रणांद्वारे, मिळालेल्या माहितीच्या आधारे घेतात. हा एक डेटावर आधारित कार्यक्रम असून तो अल्गोरिदम्सवर चालतो, भावनांवर नव्हे.
नियमाधारित (रुल-बेस्ड) यंत्रणा म्हणजे काय? नियमाधारित गुंतवणूक यंत्रणा ही काही पूर्णपणे नवीन संकल्पना नाही. जुन्या काळातील गुंतवणूकदारही अनेक वर्षांपासून ही पद्धत वापरत आले आहेत. ते कंपनीची विवरणपत्रे, कॉर्पोरेट घटना, फ्लॅश न्यूज, धोरणात्मक निर्णय (सरकारद्वारे घेतले गेलेले) आदी बाजारातील घडामोडी विचारात घेतात व त्यानुसार ‘नियम’ तयार करतात आणि त्या नियमाच्या आधारे गुंतवणूक करतात. अर्थात, अल्गोरिदम्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि प्रेडिक्टिव मॉडेलिंग यांच्या समावेशाने नियमाधारित यंत्रणा गेल्या काही वर्षांत अधिक उत्क्रांत झाली आहे. हे नियमाधारित कार्यक्रम अत्याधुनिक प्रणालींद्वारे प्रक्रिया झालेल्या महाकाय डेटावर आधारित असतात (मानवी मेंदूद्वारे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रक्रिया अशक्य आहे). ही नियमाधारित यंत्रणा गुंतवणूकादारांच्या जोखमी पत्करण्याच्या क्षमतांवर काम करते आणि त्यानुसार त्यांना सर्वोत्तम सल्ला देते. या सल्ल्याचा उपयोग करून गुंतवणूकदार त्यांचा पैसा गुंतवू शकतात.
स्मार्ट बिटा गुंतवणूक धोरण : नियमाधारित यंत्रणांच्या आधारे या कार्यक्रमांनी स्मार्ट बिटा गुंतवणूक धोरण नावाची एक नवीन संकल्पना विकसित केली आहे. हे धोरण विकसित बाजार व अर्थव्यवस्थांमध्ये प्रामुख्याने लोकप्रिय आहे. या स्मार्ट बिटा व्यूहरचनांचे उद्दिष्ट उत्पन्न वाढवणे, वैविध्य वाढवणे आणि कस्टमाइझ्ड इंडेक्सेस किंवा एक किंवा त्याहून अधिक पूर्वनिश्चित घटकांवर आधारित ईटीएफमध्ये गुंतवणूक करून जोखीम कमी करणे हे आहे. यामध्ये उद्दिष्ट असते ते इशारा देणाऱ्या निदर्शकांच्या तुलनेत सरस कामगिरी करण्याचे तसेच गुंतवणूकदार जेवढी जोखीम पत्करू इच्छितो त्या स्तरावर जोखमीचे प्रमाणक राखण्याचे. पारंपरिक निदर्शक भांडवलीकरणावर आधारित असल्यामुळे मोठे बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांना ठळक निदर्शक दिला जातो. मात्र, स्मार्ट बिटा गुंतवणूक धोरणे बाजार व कंपन्यांवर आधारित विविध निदर्श विचारात घेते व पोर्टफोलिओ निर्मिती सुलभ करते. याशिवाय, गुंतवणूक निर्णयातील मानवी पूर्वग्रहाची शक्यता काढून टाकण्यात ही पद्धत उपयुक्त ठरते. त्यामुळे नफा कमावण्याची एकंदर संभाव्यता वाढते. स्टॉक्स निवडण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी आता डेटावर आधारित दृष्टिकोन आला आहे.
गुंतवणूकदाराने माहितीपूर्ण निर्णय केला तर शेअर बाजारातील गुंतवणूक खूपच नफा मिळवून देणारी ठरू शकते. तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी दिलेला सल्ला लाभदायी ठरू शकत असला, तरी तो स्टॉक्स निवडण्याचा जुना मार्ग असतो. नियमाधारित ट्रेडिंग व गुंतवणूक यंत्रणा अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करतात. म्हणूनच अल्गोरिदम्स व डेटा अॅनालिटिक्सच्या अत्याधुनिक कार्यक्रमांचा वापर केल्या जाणाऱ्या नियमाधारित यंत्रणेने गुंतवणूकदारांना खूप फायदा मिळवून दिला आहे. अशा प्लॅटफॉर्मने दिलेला सल्ला मानवी पूर्वग्रहांपासून मुक्त असतो आणि अखेरीस अधिक नफा मिळवून देणारे गुंतवणूक निर्णय करण्यात उपयुक्त ठरतो.