Maratha reservation | मराठा समाजाला बसणार धक्का? ओबीसी नेत्यांनी केली मुख्यमंत्र्यांसमोर मोठी मागणी

Maratha reservation | राज्यात दिवसेंदिवस आरक्षणाचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज आरक्षणावरून पेटून उठला आहे. त्यामुळे राज्य सरकारची दोन्ही बाजूने कोंडी होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे देखील आक्रमक झाले आहेत.

राज्य सरकारने नुकतीच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बोलावलेल्या या बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार टाकला. विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पण राज्य सरकारने ती मागणी मान्य केली नाही.

या बैठकीली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते तसेच ओबीसी नेते उपस्थित होते. बैठक सुरु असतानाच आमदार बच्चू कडू हे सह्याद्री अतिथीगृहमधून बाहेर पडले. आपण एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी निघत आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी माध्यमांना दिली.

“मराठा समाजासाठी सगेसोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका. जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठ नुकसान होईल,” अशी रोखठोक भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली. त्याचसोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही थांबावा, अशा प्रकारची मागणी काही ओबीसी नेत्यांनी बैठकीमध्ये केली.

“मराठा आरक्षणासारख्या अतिशय महत्त्वाच्या मुद्यावर एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. मविआने ठरवून बैठकीवर बहिष्कार टाकला. पण विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या घरी बसून बैठक करत आहेत. विरोधकांच्या मते त्यांच्यासाठी कोणताच समाज महत्वाचा नाही. त्यांना फक्त निवडणुका महत्वाच्या आहेत,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीवर दिली.

Leave a Comment