Manoj Jarange Patil । राज्यात दिवसेंदिवस आरक्षणाचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज आरक्षणावरून पेटून उठला आहे. त्यामुळे राज्य सरकारची दोन्ही बाजूने कोंडी होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आक्रमक झाले आहेत.
“आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. सरकारने आरक्षण दिलं नाही तर राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेऊ,” असा गंभीर इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
“सरकारने आम्हाला धोका दिला म्हणून आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. आजपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी यावेळी सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. पोलीस भरतीत सरकारी अधिकारी जातीयवाद करत असल्याचे ते म्हणाले. हिंगोली पोलीस भरती दरम्यान मराठा तरुणाला ओबीसी प्रवर्ग बदलवून खुला प्रवर्ग लिहायला लावले, असा आरोप जरांगे पाटलांनी यावेळी केला.
मागण्यांवर ठाम
आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता. आम्ही तेवढा वेळ सरकारला दिलेला आहे. आमचे सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा. सगळे सोयरे आंमलबजावणी पाहिजे. कोणाच्या काय हरकत येत काय कामाला माहित नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004 चा कायदा असून . मराठा आणि कुणबी एकच आहेत. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली.