Manoj Jarange Patil । शांतता रॅलीपूर्वीच अशोक चव्हाण आणि संदीपान भूमरे जरांगे पाटलांच्या भेटीला, केली मोठी मागणी

Manoj Jarange Patil । राज्यात दिवसेंदिवस आरक्षणाचा मुद्दा गंभीर होत चालला आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज आरक्षणावरून पेटून उठला आहे. त्यामुळे राज्य सरकारची दोन्ही बाजूने कोंडी होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आक्रमक झाले आहेत. आजपासून त्यांची मराठवाड्यात शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे.

पण त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची नवनिर्वाचित खासदार संदीपान भूमरे आणि अशोक चव्हाण यांनी अंतरावली सराटीत येऊन भेट घेतली आहे. दरम्यान, जरांगे यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

या भेटीदरम्यान, हैदराबाद गॅझेट आणि सगे सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या मागणीनुसार करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. माहितीनुसार, शिंदे समिती सोमवारी हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान शिंदे समिती हैदराबाद गॅझेटबाबत पुरावे जमा करणार आहे. मराठा कुणबी असल्याचं या नोंदी ऐतिहासिक पुरावे हे हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून जमा केले जातील.

कुणबी आरक्षण लागू करण्यासाठी हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट आणि सातारा संस्थानचे गॅझेट आधार घ्यावा, अशी मोठी मागणी जरांगे पाटील यांची आहे. त्यादृष्टीने सरकार काय काम करीत आहेत याची माहिती देखील अशोक चव्हाण आणि संदिपान भुमरे यांनी दिली आहे. तसेच या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

Leave a Comment