Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार! घेतला मोठा निर्णय

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील हे मागील अनेक महिन्यांपासून मराठा समाजासाठी रिंगणात उतरले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचे आरक्षण लागू व्हावे, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.

याच मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून आगामी 6 जुलैपासून ते मराठवाड्यातील हिंगोलीतून त्यांच्या मराठा महाएल्गार संवाद रॅली काढणार आहे. दरम्यान, जरांगे पाटील मराठवाड्यातील वेगवेगळ्या शहरांत हे सभा घेऊन पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा प्रकाशात आणणार आहेत. त्यामुळे हिंगोलीतील महाएल्गार संवाद रॅली महत्त्वाची मानली जातेय.

सध्या हिंगोलीमध्ये मनोज जरांगे यांच्या या संवाद रॅलीची जय्यत तयारी सुरु असून या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव हिंगोली शहरात दाखल होतील. शहरातील प्रत्येक चौकात आणि मोक्याच्या ठिकाणी 200 भोंगे लावण्याचे काम आता सुरू केले आहे. संवाद रॅलीसाठी आलेल्या मराठा समाज बांधवांना सर्व सूचना आणि मनोज जरांगे यांचं भाषण चांगल्या पद्धतीने ऐकता यावे, यासाठी ही तयारी सुरू आहे.

दरम्यान, 6 जुलैला होणाऱ्या रॅलीसाठी मराठा महाएल्गार संवाद रॅलीमध्ये जवळपास दोन लाख मराठा बांधव उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

Leave a Comment