Manoj Jarange Patil । आरक्षणावरून जरांगेंची मोठी घोषणा! म्हणाले; “आता मेलो तरी…”

Manoj Jarange Patil । मागील काही महिन्यांपासून आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्याचे वातावरण चांगलेच पेटले आहे. मराठा,ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून राज्य सरकारची चांगलीच कोंडी होत आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. काल त्यांची छत्रपती संभाजीनगर शांतता रॅली पार पडली. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना 20 तारखेला उपोषण सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आपण कठोर उपोषण करणार असल्याचं म्हटलं आहे.

“गोरगरीब मराठ्यांना कोणी अडचणीत आणत असेल, तर बघ्याची भूमिका घ्यायची नाही. मदतीला जायचं मराठा समाजाला आवाहन आहे. मराठा अधिकाऱ्यांना त्रास दिला तर त्याच्या मदतीला जायचं. मला कोणत्या वेळेला मरण येईल, सांगता येत नाही. तरीही मी मागे हटणार नाही. आमच्या महिला रस्त्यावर आहेत, तुमचं सरकार का पाडू नये फडणवीस साहेब?,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

“सरकारने मला उघड पडायचा प्रयत्न केला आहे. याला एक तर बदनाम करा, नाहीतर घातपात करा. सरकार मला काय घातपात करेल. मला जो मारायला येणार आहे, त्याने फक्त मी जागी असल्यावर यावं, एका बुक्कीत दात पाडेल. २० तारखेलाच मुंबईत कधी जायचं, याची तारीख ठरवणार. मराठ्यांच्या मतावर आमदार होऊन मराठ्यांच्याच घराच्या समोर डीजे लावून नाचत त्रास द्यायचा नाही. तुम्ही आनंद घ्या जल्लोष करा. ज्या आमदारांनी त्यांना मतदान केले, त्यांनी त्या आमदारांना सांगावे,” असेही जरांगे पाटलांनी स्पष्ट केले.

Leave a Comment