Manoj Jarange । मराठा समाज आणि ओबीसी समाज आरक्षणावरून पेटून उठला आहे. त्यामुळे राज्य सरकारची दोन्ही बाजूने कोंडी होताना दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी आक्रमक झाले आहेत.
राज्य सरकारने नुकतीच मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मराठवाड्यात शांतता रॅली काढली असून या रॅलीदरम्यान त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, “आमची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे. फक्त सगे सोयरेची अंमलबजावणी झाली नाही. तेच आमचं म्हणणं आहे की लवकर अंमलबजावणी करा. 13 तारखेपर्यत वाटत नाही की सरकार आमचा गेम करणार,”
सत्ताधारी आणि विरोधकांना गांभीर्य नाही. त्यांना कधीही गरीबांशी देणं घेणं नाही. सगेसोयरे अध्यादेशाप्रकरणात ओबीसी नेत्यांनी विरोध केला. मराठा नेते बोलत नाही. कुणीही कितीही म्हटलं की राज्य या मुद्यांमुळे पेटत असून कुणीही कितीही स्वप्न पाहिले तरी आम्ही राज्य पेटू देत नाही. महाविकास आघाडी आणि महायुती, सत्ताधारी आणि विरोधकांना या मुद्यावरुन आम्ही राजकीय पोळी भाजू देणार नाही,” असा गंभीर इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही भुजबळ यांच्या विरोधात बोलतो मग बाकीचे ओबीसी नेते का फुकट भांडण ओढून घेतात बाकीचे ओबीसी नेते विष पेरत नाही म्हणून आम्ही त्यांना बोलत नाही. भुजबळ धनगर समाजाच्या बाजूने बोलत नाही तरीही तुम्ही त्याचं का ऐकता सरकारने आम्हाला ढकलायची चुकूनही चूक करू नये.”