Manipur Violence : काही दिवसापूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर पुन्हा एकदा मणिपूरमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.
याबाबत माहिती देत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी सांगितले की, घरांची जाळपोळ आणि नागरिकांवर गोळीबार करणाऱ्या सुमारे 40 जणांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे.
राज्य सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दावा केला की नुकत्याच झालेल्या चकमकी प्रतिस्पर्धी समुदायांमध्ये नसून कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमधील होत्या. बिरेन सिंग म्हणाले की, फॉरवर्ड नागरिकांवर हल्ले करण्यासाठी Ak-47, M-16 आणि स्नायपर रायफल वापरत आहेत.
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच
ते म्हणाले की, सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल या दहशतवाद्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनी जनतेला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हालचालीत अडथळा आणू नये, असे आवाहन करून सरकारवर विश्वास ठेवावा आणि सुरक्षा दलांना साथ द्यावी, असे आवाहन केले.
बिरेन सिंह म्हणाले की, आम्ही इतके दिवस अडचणी अनुभवल्या आणि आम्ही राज्याचे कधीही विघटन होऊ देणार नाही. ते म्हणाले की, जाट रेजिमेंटने नागरिकांच्या हत्येमध्ये आणि मालमत्तेचे नुकसान आणि घरांची जाळपोळ करण्यात गुंतलेले अनेक कुकी अतिरेकी पकडले गेले आहेत.
अधिका-यांनी सांगितले की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याने समुदायांना नि:शस्त्र करण्यासाठी शोध मोहीम सुरू केल्यानंतर पहाटे ताज्या चकमकीला सुरुवात झाली.
भाजप नेत्याच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ
भारतीय जनता पक्षाचे आमदार खवैरकपम रघुमणी सिंग यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आणि त्यांची दोन वाहने इंफाळ पश्चिम येथील उरीपोक येथे जाळण्यात आली, असे एका उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.
इम्फाळ खोऱ्याच्या आजूबाजूच्या विविध जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या सुमारास अनेक ठिकाणी चकमकी झाल्या, असेही ते म्हणाले. “आमच्या माहितीनुसार, काकचिंगमधील सुगनू, चुराचंदपूरमधील कांगवी, इंफाळ पश्चिममधील कांगचूप, इम्फाळ पूर्वमधील सगोलमांग, बिशेनपूरमधील नुनगोइपोकपी, इंफाळ पश्चिममधील खुरखुल आणि कांगपोकपीमधील YKPI येथे गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, काकचिंग पोलिस ठाण्यातून मेईतेई गटाने शस्त्रे लुटल्याची अपुष्ट माहिती देखील मिळाली आहे. अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा या मागणीसाठी मेईतेई समुदायाने 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढल्यानंतर मणिपूरमध्ये जातीय संघर्षात 75 हून अधिक लोक मारले गेले. राज्यातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी अर्धसैनिक दलांव्यतिरिक्त, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या सुमारे 140 कंपन्या, ज्यात 10,000 हून अधिक जवानांचा समावेश आहे, तैनात करावे लागले.