रत्नागिरी : लहरी निसर्गाचा सर्वाधिक फटका यंदा फळबागांना बसला आहे. अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष बागांचे, तर कोकणात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हंगामाच्या सुरवातीपासूनच अतिवृष्टी, गारपिट, थंडीचा कडाका आणि आता काढणीच्या वेळी झालेला अवकाळी पाऊस. त्यामुळे एकूण उत्पादनापैकी केवळ 20 ते 25 टक्केच उत्पादन हातात येणार आहे.. फळांच्या राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूसला मोठी मागणी असते. मात्र, यंदा खवय्यांना या आंब्याची चव चाखण्यासाठी तब्बल महिनाभराची प्रतिक्षा करावी लागली. शिवाय माल कमी असल्याने त्याचा दरही वाढलेला आहे.. बाजारात हापूस दिसत असला, तरी वाढत्या दरामुळे ग्राहकांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल.
बाजारात यंदा आंबा यायला उशीर झाला असला, तरी मुंबई बाजारपेठेत तो दाखल झालाय. प्रतिकूल परस्थितीतही जानेवारीपासून मार्चपर्यंत येथील वाशी मार्केटमध्ये 1 लाख पेट्यांमधून हापूसची आवक झाली आहे. तसेच 10 हजार पेट्यांची निर्यात ही आखाती देशांमध्ये करण्यात आली आहे. त्यात दुबई, ओमान नि कुवेतमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात झाली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायतदार शेतकऱ्यांवरही नुकसान भरपाई मागण्याची वेळ आलीय. वर्षभर झालेला खर्च आणि पदरी पडलेले उत्पादनाचा कुठेच मेळ बसत नाही.. त्यामुळे आंबाउत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आतापर्यंत कोकणातील आंब्याची चव सर्वांनी चाखली, पण आता उत्पादकच अडचणीत आला असून सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोकणात तीन टप्प्यात आंबा उत्पादन घेतले जाते. जानेवारीपासूनच त्याची सुरवात होते, पण याच कालावधीपासून सुरु झालेल्या निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आंबा उत्पादकांना करावा लागला. सुरवातीला अवकाळी पावसामुळे मोहोर गळाला.. नंतर त्यातून सावरत असताना पुन्हा गारपिटीशी दोन हात करावे लागले. निसर्गाच्या अवकृपेमुळे तिन्ही टप्प्यातील उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही. परिणामी, मोठा खर्च करुनही शेतकऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच राहिल्याचे दिसत आहे..
काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग; ‘त्या’ पदावरून सोनिया-प्रियांका गांधी देणार राजीनामा?
IPL 2022: धोनीशी लग्न केल्यानंतर साक्षी झाली होती नाराज; स्वतः केला मोठा खुलासा