Maldives Election | मालदीवमध्ये चीन समर्थकांचा विजय, भारताला धोक्याची घंटा; पहा, काय घडलं?

Maldives Election : मालदीवमध्ये रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत (Maldives Election) मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचा पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले आहे. सत्ताधारी पक्षाने संसदेच्या 93 पैकी 67 जागांवर विजय मिळवला आहे. काही ठिकाणी अजूनही मतमोजणी सुरू आहे. चीनचे समर्थक असलेल्या मुइज्जू यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मालदीवमधील निकालांवर भारत आणि चीनचे लक्ष होते. परंतु या निवडणुकीत चीन समर्थक असलेल्या मुइज्जू यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मालदीवमध्ये रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने 67 जागांवर विजय मिळवला. मालदीवमध्ये प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारत आणि चीनचे संसदीय निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष होते. संसदीय निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष मालदिवियन डेमोक्रॅटिक पक्षाने 12 जागा जिंकल्या आणि अपक्ष उमेदवारांनी 10 जागांवर विजय मिळवला. मालदीव विकास आघाडी आणि अन्य पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली.

India Maldives Tension | भारतानंतर चीनचाही मालदीवला दणका, पैशांचं गणितच बिघडलं; पहा, काय घडलं?

Maldives Election

स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपेट्या बंद केल्या आणि संसदेच्या 93 जागांसाठी 368 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीत पीपल्स नॅशनल काँग्रेसने 90 जागांवर उमेदवार दिले होते तर प्रमुख विरोधी मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीने 89 जागांवर उमेदवार उभे केले होते.

हिंद महासागरात मालदीव सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी आहे. अशा परिस्थितीत भारत आणि चीन मालदीवमध्ये आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. मुइज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि चीनमधील तणाव आणखी वाढला. मुइज्जू चीन समर्थक मानले जातात आणि त्यांनी सातत्याने चीनला समर्थन देणारी भूमिका घेतली आहे. मुइज्जू सत्तेत आल्यानंतर भारत आणि मालदीव यांचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

India Maldives Row : मालदीवला भारतीयांचा झटका, ‘लक्षद्वीप’कडे मोर्चा; मालदीवचे ‘इतके’ नुकसान

Maldives Election

यानंतर वाद जास्त वाढू नये म्हणून मालदीव सरकारने मंत्र्यांवर कारवाई देखील केली होती. परंतु या घटनेनंतर दोन्ही देशातील संबंध तणावाचे बनले. या संबंधात अजूनही फारशी सुधारणा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य वापरल्यामुळे भारतीय नागरिक देखील नाराज झाले होते. त्यांनी मालदीववर बहिष्कार टाकला. मालदीवऐवजी अन्य पर्यटनाच्या ठिकाणी जाणे त्यांनी पसंत केले. यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला होता. भारतीय पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. अजूनही या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

दरम्यान, मालदीवमधील ही निवडणूक भारत विरोधी प्रचारावर आधारित होती. ज्यामध्ये त्यांनी माजी राष्ट्रपतींवर भारताला जास्त महत्त्व देऊन राष्ट्रीय सार्वभौमत्वाशी तडजोड केल्याचा आरोप केला होता. किमान 75 भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये तैनात करण्यात आले होते आणि भारताने दान केलेली दोन विमाने चालवली जात होती. समुद्रात अडकलेल्या किंवा संकटांना तोंड देत असलेल्या लोकांच्या मदतकार्यात मदत केली होती. मुइज्जू यांनी या लष्करी कर्मचाऱ्यांना हटविण्याच्या दिशेने पावले उचलली होती.

Leave a Comment