Malaysia Helicopter Crash | हेलिकॉप्टर क्रॅश होऊन मोठा अपघात; ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

Malaysia Helicopter Crash : मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. नेव्हल मिलिटरी (Malaysia Helicopter Crash) परेड दरम्यान दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर अचानक कोसळले. या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था आयएएनएसच्या वृत्तानुसार मलेशियाच्या पेराक राज्यात मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली. रॉयल मलेशियन नेव्हीकडून एका निवेदनात सांगण्यात आले की स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता लूमूट रॉयल मलेशियन नौदल तळावर फ्लायपास्ट सरावादरम्यान ही घटना घडली. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एका हेलिकॉप्टरमध्ये सात कर्मचारी होते तर दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण बसले होते. या सर्व पीडितांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 23 सेकंदाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन हेलिकॉप्टर अगदी जवळून उडताना दिसत आहेत. त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच हे दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळतात. दोन्ही हेलिकॉप्टरच्या पंख्यांची टक्कर होते आणि काही वेळातच ते आकाशातून जमिनीवर कोसळत असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.

China Taiwan Conflict : तैवानच्या संकटात चिन्यांनी साधला डाव; पहा, काय केलाय कारनामा?

Malaysia Helicopter Crash

या दुर्घटनेनंतर मलेशियाचे पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. या घटनेवर नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या घटनेबद्दल बऱ्याच जणांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर मलेशियाच्या नौदलाने एक निवेदन जारी केले. नौदलाच्या वर्धापनदिनानिमित्त हेलिकॉप्टर सराव केला जात होता. परंतु, हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू पावलेले सर्वजण क्रू मेंबर्स होते. या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी लुमूट एअर बेस हॉस्पिटलमध्ये मृतदेह पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टर कोसळण्याच्या घटनांत मोठी वाढ झाल्याने चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. आता प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या तपासात अपघाताचे खरे कारण समोर येईल.

India Maldives Tension | भारतानंतर चीनचाही मालदीवला दणका, पैशांचं गणितच बिघडलं; पहा, काय घडलं?

Leave a Comment