अहमदनगर : सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात आपण नाश्त्यात इडली सांबर, पराठा, उपमा, पोहे असे पदार्थ घेतो. भजे मात्र कधीतरी केले जातात. खरे तर हिवाळ्याच्या दिवसात चहा बरोबर भजे आधिकच स्वादिष्ट ठरतात. भजे वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जातात. आपल्याकडे कांदा भजे, कोबीचे भजे, बटाटा भजे तयार केले जातात. पालकाचे भजेही विशेष पसंत केले जातात. पालक हा आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे.
पालकामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी सोबत लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. अनेक आरोग्य फायद्यांसाठी तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश करू शकता. तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा अनेक प्रकारे समावेश करू शकता. पालकामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. हे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. पालकामध्ये व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी असते. हे पोषक तत्व डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. पालकाचे भजेही आपल्याकडे नेहमीच केले जातात. मात्र, आज आम्ही तुम्हाला स्वादिष्ट पालक भजे तयार करण्याची खास रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी.
साहित्य – 200 ग्रॅम बेसन, 3/4 कप पाणी, दीड चमचा लाल तिखट, 3 चिमूट मीठ, 100 ग्रॅम बारीक केलेला पालक, दीड चमचा हळद, 1 कप तेल, 2 हिरव्या मिरच्या.
रेसिपी
सर्वात आधी पालकाची पाने पाण्यात धुवून स्वच्छ करून बाजूला ठेवा. पाणी पूर्णपणे ओसरल्यावर पाने कट करुन घ्या. आता एक भांडे घ्या आणि त्यात बेसन आणि पालक मिसळा. मीठ, लाल तिखट, हळद आणि हिरव्या मिरच्या टाका. पाणी घालून चांगले मिसळून घ्या. त्यानंतर मोठ्या आचेवर एका जाड कढईत तेल गरम करा. या पिठाचे छोटे तुकडे करून हलके सोनेरी होईपर्यंत तळा. भज्यांचे जास्तीचे तेल कागदावर काढून टाका. हे भजे चिंचेची चटणी आणि गरमागरम चहासोबत सर्व्ह करा.
हिवाळ्यात ‘अशा’ पद्धतीने बनवा टेस्टी कांदा भजे; नाश्त्यात चहाबरोबर भजे सर्व्ह करा..