Make Reels-Collect Gift: अहमदनगर : आपण सर्वांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून मागील ७५ वर्षात भारताने आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचा सर्वांना अभिमान आहे. मात्र, तरीही आपल्याकडे असलेल्या सामाजिक समस्या काही मिटलेल्या नाहीत. त्याच समस्यांना संवाद पटलावर आणून त्यावर मात करण्यासाठी म्हणून सरकारवर सकारात्मक नैतिक दबाव टाकण्याच्या उद्देशाने ‘रील्स बनवा.. बक्षीस मिळवा..!’ ही स्पर्धा ‘सकल भारतीय समाज संघटने’च्या वतीने आयोजित केली आहे.
‘सकल भारतीय समाज संघटने’चे समन्वयक सचिन चोभे, प्रशांत जाधव आणि जैद शेख नेवासकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ‘मला जाणवलेला सामाजिक प्रश्न’ या विषयावर ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत रिल्स अपलोड करण्याचा कालावधी शनिवार-रविवार (दिनांक १९-२० ऑगस्ट २०२३) असा दोन दिवसांचा आहे. तर यामध्ये सहभागी रिल्स स्टार मंडळींना पहिले बक्षीस ₹ १०००/-, दुसरे बक्षीस : ₹ ७५०/-, तिसरे बक्षीस : ₹ ५००/- आणि इतर उल्लेखनीय वाटलेल्या दहा रिल्स स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘सकल भारतीय समाज संघटने’च्या वतीने ‘रिल्स बनवा, बक्षीस मिळवा’ ही अतिशय वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोपे नियम
आपल्या INSTA खात्यावर व फेसबुकवर इन्स्टंट रील्स बनवून आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. यासाठी फक्त एकच अट आहे. आपल्याला असे रील शेअर करताना त्याला समर्पक असे hashtag जोडायचे आहेत. मात्र, यासाठी विषय सामाजिक असावा आणि ज्यांना सर्वाधिक लाइक आणि शेअर मिळतील यासह विषय निवड हा मुद्दाही तितकाच महत्वाचा असणार आहे. यातले लाइक आणि शेअर यासाठी ५० टक्के गुण असतील तर, ५० टक्के तुमच्या विषय निवडीला आहेत. त्यामुळे #सकलभारतीयसमाज आणि #vichar_swatantrya , #विचार_स्वातंत्र्य , #रिल्सबनवा_बक्षीसमिळवा हे hashtag जोडून या अफलातून स्पर्धेत सहभागी व्हावे. कारण रील्स पण स्वातंत्र्याचा जयघोष करण्याचे माध्यम आहे.
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीसह मुक्त जगण्याची उर्मी असून अशीच उर्मी आपल्या सर्वांना १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मिळाली आहे. त्यामुळे आता विषय मनात ठरवा, एखादी सामाजिक समस्या निवडा, व्हिडिओ कसा बनवावा यांचे नियोजन करा आणि त्याचे रील्स बनवून इंस्टा आणि फेसबुक यावर योग्य hashtag देऊन शेअर करा. यामध्ये एकच व्यक्ती कितीही रील्स बनवून सहभागी होऊ शकतो. कारण आपल्या अभिव्यक्तीला बंधन नसते. म्हणूनच सामाजिक समस्या समाजासमोर मांडून आपण आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य शेअर करून याद्वारे बक्षीस मिळवू शकता.
महत्त्वाच्या अटी आणि सहभागी होण्याचे मुद्दे
अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर बंधन आणणाऱ्या काहीही अटी यात नसल्या तरी पण एक अट मात्र सर्वांनी पाळायची आहे. कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तर, ती असते एक जबाबदारी. म्हणून इतरांच्या भावना आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व लक्षात घेऊन इतरांच्या भावना दुखावणार नाही अशा पद्धतीने रिल्स बनवा. संबंधित प्रवेशिका रिल्सचे कॉपीराइट संबधित स्पर्धकांचे असेल. त्यामुळे त्यामधील कंटेंटला पूर्णपणे तेच जबाबदार असतील. तसेच अशा आक्षेपार्ह प्रवेशिका नाकारण्याचा अधिकार आम्ही यंत्रणा म्हणून राखीव ठेवला आहे. आपण बनवलेले रिल्स हे व्यवस्थित hashtag करावेत. तसेच आपल्या रिल्सची लिंक पुढील व्हॉट्सअप लिंकवर पाठवावी. लिंक पाठवताना समवेत पुढील माहिती पण असावी. जसे की नाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर आदि. पुढील व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून यात आपण सहभागी होऊ शकता : https://chat.whatsapp.com/FAUMMNI1vgVLqBXrlmzgte