Mahindra XUV 3XO : अवघ्या दोन लाखात खरेदी करा महिंद्राची नवीन कार, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Mahindra XUV 3XO : तुम्ही आता दोन लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटनंतर Mahindra XUV 3XO चे MX2 प्रकार घरी नेऊ शकता. कंपनीच्या या कारमध्ये अनेक शानदार फीचर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

जाणून घ्या किंमत

किमतीचा विचार केला तर XUV 3XO, MX2 चे दुसरे बेस व्हेरिएंट, महिंद्राने 8.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर केले आहे. तर कंपनीची ही कार दिल्लीत खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकूण 10.23 लाख रुपये मोजावे लागतील. तर 8.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीशिवाय, या किंमतीमध्ये 70930 रुपये आरटीओ, 47109 रुपयांचा विमा आणि 2,000 रुपयांचे इतर शुल्कचा समावेश केला आहे.

किती भरावा लागणार EMI?

तर तुम्ही या कारचा दुसरा बेस व्हेरिएंट MX2 खरेदी केला तर बँकेकडून केवळ एक्स-शोरूम किंमतीवर वित्तपुरवठा करण्यात येईल. 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला सुमारे 8.23 ​​लाख रुपयांची रक्कम बँकेकडून फायनान्स करावी लागणार आहे. जर बँक तुम्हाला 8.7 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 8.23 ​​लाख रुपये देत असल्यास तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा केवळ 13116 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे.

किती असणार कारची किंमत?

समजा तुम्ही बँकेकडून 8.7 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 8.23 ​​लाख रुपयांचे कार लोन घेतले असल्यास तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 13116 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. सात वर्षांत तुम्हाला महिंद्राच्या XUV 3XO च्या MX2 प्रकारासाठी सुमारे रु. 2.78 लाख व्याज द्यावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 1301773 लाख रुपये असणार आहे.

Leave a Comment