Mahindra XUV 3XO : नवीन Mahindra XUV 3XO चे बुकिंग सुरु, Nexon आणि Brezza ला देतीय कडवी टक्कर

Mahindra XUV 3XO : भारतीय बाजारात नुकतीच महिंद्राने त्यांची नवीन कॉम्पॅक्ट SUV XUV 3XO सादर केली आहे. किमतीचा विचार केला तर कारच्या एक्स-शोरूम किंमत 7.49 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारचे बुकिंग सुरु झाले असून ती Nexon आणि Brezza ला कडवी टक्कर देते.

Mahindra XUV 3XO चे इंजिन आणि पॉवर

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर नवीनमध्ये 3 इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर त्याचे दुसरे इंजिन देखील 1.2L टर्बो पेट्रोल आहे जे 96kW ची शक्ती आणि 200 Nm टॉर्क निर्माण करते. त्याचे तिसरे 1.5L टर्बो डिझेल इंजिन 86Kw ची शक्ती आणि 300 Nm टॉर्क निर्माण देते. ही इंजिने मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेसने सुसज्ज असून ती 21.2 किमी/ली पर्यंत मायलेज देतात.

जाणून घ्या डिझाइन आणि फीचर्स

नवीन XUV 3XO मध्ये 80 च्या दशकातील डिझाइनमध्ये नावीन्य असून त्याची पुढची रचना बोल्ड आहे. बाजूला आणि मागील बाजूने त्याची रचना प्रीमियम अनुभव देते. या कारमध्ये 26.03 सेमी ट्विन एचडी स्क्रीन दिली आहे आणि ते अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेला सपोर्ट करेल.

सुरक्षेसाठी कारमध्ये लेव्हल 2 ADAS, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, 6 एअरबॅग्ज, सर्वात मोठा सनरूफ आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. जागेच्या बाबतीतही ही एक चांगली एसयूव्ही असून दैनंदिन वापराव्यतिरिक्त, आपण यासह लाँग ड्राइव्हचा आनंद घेऊ शकता.

Leave a Comment