Mahindra XUV300 : भारतीय कार बाजारामधुन जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल.
तर तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या बाजारात टाटाची जबरदस्त कार Tata Panch ला टक्कर देण्यासाठी Mahindra ने आपली नवीन कार लॉन्च केली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात महिंद्राने Mahindra XUV300 चा नवीन व्हेरियंट लॉन्च केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो महिंद्राने या लाइनअपमध्ये W2 मॉडेलला बेस व्हेरिएंट म्हणून जोडले आहे.
यामुळे आता ही कार खरेदीसाठी तुम्हाला एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये मोजावी लागणार आहे. तर दुसरीकडे तुम्ही ही कार W2, W4, W6, W8 आणि W8 (पर्यायी) पाच व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकतात.
कंपनीने Mahindra XUV300 च्या TurboSport रेंजमध्ये एक नवीन W4 व्हेरियंट जोडला आहे. टर्बोस्पोर्टच्या नवीन W4 व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9.33 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यात काही अतिरिक्त फीचर्स कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र हे जाणुन घ्या त्याच्या डिझेल व्हेरियंटच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
W4 ट्रिम सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफसह येते.
Mahindra XUV300 ची W4 ट्रिम तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफ देते.
दुसरीकडे या कारमध्ये तुम्हाला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल सारखी फीचर्स मिळणार आहे.
Mahindra XUV300 इंजिन
हे जाणुन घ्या की कंपनी XUV300 मध्ये तीन इंजिन पर्याय आपल्या सबकॉम्पॅक्ट SUV मध्ये देते. त्यातील पहिले 1.2-लिटर, इनलाइन तीन-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन (109 bhp आणि 200 Nm) आहे. दुसरे 1.5-लिटर, इनलाइन चार-सिलेंडर टर्बो-डिझेल इंजिन (115 bhp आणि 300 Nm) आहे.
यासोबत तुम्हाला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड AMT पर्याय मिळेल. तिसरा इंजिन पर्याय म्हणजे 1.2-लिटर, तीन-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल mStallion इंजिन (129 bhp आणि 230 Nm टॉर्क). जे बूस्ट फंक्शनसह 250 Nm टॉर्क बनवते. यासोबतच 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.