Mahindra Thar Roxx । अखेर ठरलं! ‘या’ दिवशी बाजारात धुमाकूळ घालणार महिंद्राची नवीन थार, मिळतील शानदार फीचर्स

Mahindra Thar Roxx । भारतीय बाजारात लवकरच महिंद्रा थार रॉक्स लाँच होणार आहे. कंपनीची नवीन कार शानदार फीचरसह बाजारात दाखल होईल. जाणून घेऊयात या कारबद्दल.

विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट रोजी दुसरी पिढी तीन दरवाजा थार सादर केली होती. नवीन टीझरमध्ये वाहनाच्या बाहेरील भागाची झलक पाहायला मिळते. नवीन मॉडेलमध्ये काही खास आणि नवीन पाहायला मिळेल का ते पाहणे महत्त्वाचे असेल.

नवीन व्हिडिओ टीझरमध्ये, नवीन थार रॉक्सचे बाह्य तपशील स्पष्टपणे दृश्यमान असून या कारमध्ये वर्तुळाकार एलईडी हेडलाइट्स पाहायला मिळत आहेत. यासोबतच सी-आकाराचे एलईडी डीआरएल दिले आहे. नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील देखील वाहनात दिले आहेत, ज्यामुळे ते जास्त स्पोर्टी दिसते.

इतकेच नाही तर ब्लॅक व्हील आर्च क्लेडिंग देखील पाहायला मिळते. याशिवाय मागील दरवाजाच्या हँडलच्या स्थितीतही बदल पाहायला मिळतात. नवीन थार रॉक्सचे बॅजिंग उजव्या बाजूच्या समोरच्या फेंडरवर ठेवले आहे.

फीचर्स

नवीन थार रॉक्समध्ये अनेक प्रगत सेफ्टी फीचर्सचा समावेश केला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, स्टिअरिंग व्हीलवर 360 डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक एसी, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरामिक सनरूफ, एलईडी लाईट्स, ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, ऑडिओ आणि म्युझिक कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये असू शकतात.

इंजिन आणि पॉवर

नवीन थार रॉक्स तीन इंजिन पर्यायांसह लॉन्च करण्यात येईल. तर 2.2 लीटर डिझेल आणि 2.0 लीटर पेट्रोल इंजिन सोबत 1.5 लीटर डिझेल इंजिन देखील यामध्ये दिले जाऊ शकते. हे लक्षात घ्या की हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह असतील. ज्यावेळी कारमध्ये या प्रकारचा गियर सेटअप असतो त्यावेळी ते मायलेजसह चांगले कार्यप्रदर्शन प्रदान करते.

Leave a Comment