Mahindra Thar 5 door : लहान डिझेल इंजिनमध्ये येणार महिंद्रा थार 5 डोअर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Mahindra Thar 5 door : महिंद्राची थार लाँच झाल्यापासून अजूनही बाजारात चांगलीच धुमाकूळ घालत आहे. कंपनीच्या या कारला भारतीय बाजारात चांगलीच मागणी आहे. जर तुम्ही या कारचे दिवाने असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता महिंद्रा थार 5 डोअर लहान डिझेल इंजिनमध्ये खरेदी करू शकता. कंपनी लवकरच आपली कार बाजारात लाँच करू शकते.

मिळेल 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन

हे लक्षात घ्या की महिंद्रा थार 5-डोरला 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळेल जे 117hp पॉवर आणि 300 Nm टॉर्क देईल. याशिवाय महिंद्रा थार 5 डोअरमध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लीटर टर्बो डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. इतकेच नाही तर हे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देखील उपलब्ध असणार आहे. 5 डोअर मॉडेलमध्ये 2WD आणि 4WD पर्याय देखील दिले जाण्याची शक्यता असते.

मिळतील आधुनिक फीचर्स

यावेळी नवीन 5 डोअर थारमध्ये अनेक चांगली फीचर्स पाहायला मिळतील. तसेच ग्राहकांच्या सुरक्षेसाठी यामध्ये एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, प्रगत ADAS (प्रगत ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टीम) यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे.

5 डोअर मॉडेलमध्ये 2WD आणि 4WD पर्याय देखील दिले जाण्याची शक्यता आहे. पण महिंद्राने अजून महिंद्रा थार 5 डोअरसाठी बुकिंग सुरू केलेले नाही, पण सूत्रांच्या माहितीनुसार, काही डीलर्सने अनधिकृतपणे बुकिंग घेणे सुरू केले आहे. किमतीचा विचार केला तर नवीन थारची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा सुमारे 3 लाख रुपयांनी महाग असू शकते.

सिंगल-पेन सनरूफ

नवीन महिंद्रा थार 5 डोअरला सिंगल-पेन सनरूफ आणि काढता येण्याजोग्या पॅनल्ससह हार्ड टॉप प्रकार मिळतो. हे लक्षात घ्या की सध्याच्या थारमध्ये सनरूफची सुविधा उपलब्ध नाही. नवीन थार 5-डोअर सध्याच्या Scorpio-N च्या शिडी-फ्रेम चेसिसवर आधारित असणार आहे, जो घन स्टीलने बनलेला आहे. म्हणजेच नवीन मॉडेल खूप मजबूत असणार आहे.

Leave a Comment