Mahindra Price Hike : जर तुम्ही महिंद्राची कार खरेदी करणार असाल तर तुम्हाला आता नवीन कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण थारनंतर महिंद्राच्या कारच्या किमती महाग झाल्या आहेत.
महिंद्रा बोलेरो निओची वाढली किंमत
आता बोलेरो निओ खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. किमतीचा विचार केला तर कंपनीने त्याची किंमत 14,000 रुपयांनी वाढवली आहे. तर या वाहनात 4 प्रकार उपलब्ध आहेत, कंपनीने त्याची किंमत 5000 रुपयांवरून 14000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. बोलेरोमध्ये फक्त डिझेल इंजिन आहे आणि त्याचे सर्व प्रकार मॅन्युअल गिअरबॉक्सने सुसज्ज असून या SUV ची किंमत 9.95 लाख ते 12.15 लाख रुपये आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये मिळतात 30 प्रकार
महिंद्रा स्कॉर्पिओ आता २५ हजार रुपयांनी महाग झाली असून या SUV मध्ये 30 प्रकार उपलब्ध आहेत. हे पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. यात 2WD आणि 4WD चा पर्याय देण्यात आले आहे. किमतीचा विचार केला तर स्कॉर्पिओची किंमत 13.85 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.54 लाख रुपयांपर्यंत जाते.
महिंद्रा स्कॉर्पिओची विक्री
मागील महिन्यात महिंद्रा स्कॉर्पिओच्या एकूण 14,807 युनिट्सची विक्री झाली होती, तर या वर्षी मार्च महिन्यात कंपनीने 15,151 युनिट्सची विक्री केली होती. सध्या स्कॉर्पिओ ही सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही आहे. मागील वर्षीही एप्रिल महिन्यात स्कॉर्पिओच्या एकूण ९,६१७ युनिट्सची विक्री झाली होती. याचा अर्थ या वेळी या स्कॉर्पिओच्या विक्रीत 54% वाढ झाली असून एकट्याचा बाजारातील हिस्सा 36.11% आहे. स्कॉर्पिओ एन दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.