Mahindra bolero neo : ‘ही’ आहे महिंद्राची शक्तिशाली SUV! कमी किमतीत मिळतात शानदार फीचर्स

Mahindra bolero neo : महिंद्राच्या कारला बाजारात चांगली मागणी आहे. कंपनी सतत आपल्या नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार लाँच करत असते. महिंद्रा बोलेरो निओ ही महिंद्राची शक्तिशाली SUV आहे. यात कमी किमतीत शानदार फीचर्स मिळतात.

महिंद्रा बोलेरो निओ

ही महिंद्राची 7 सीटर SUV असून यात 17 kmpl चा उच्च मायलेज मिळेल. या शानदार कारमध्ये हाय स्पीडसाठी 5 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. ही कार 140 किमी/ताशी टॉप स्पीड देत असून या कारच्या टॉप मॉडेलमध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर दिले आहेत. या कारमध्ये ऑटो एसी आणि मागील सीटवर चाइल्ड अँकरेज सारखी सेफ्टी फीचर्स आहेत. कंपनीच्या या कारच्या समोर एक स्टायलिश ग्रिल आहे, ही कार अतिशय बोल्ड आणि मस्क्युलर लूकमध्ये खरेदी करता येईल..

महिंद्रा बोलेरो निओ वैशिष्ट्ये

कारला 160 मिमी ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. ग्राउंड क्लीयरन्स म्हणजे कारच्या प्लॅटफॉर्म आणि ग्राउंडमधील अंतर होय. या कारमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे. ही कार मागील पार्किंग सेन्सरसह येत असल्याने कार बॅक करणे सोपे होते. ही एक हाय एंड कार असून कारचा टायर 15 इंच आहे.

इतकेच नाही तर कार 1493cc हाय पॉवर डिझेल इंजिनसह येते ज्यात हाय पिकअपसाठी 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. किमतीचा विचार केला तर या कारचे बेस मॉडेल 9.94 लाख रुपये एक्स-शोरूम आणि टॉप मॉडेल 15.04 लाख रुपये रोड किमतीत ऑफर करण्यात येत आहे.

यात मागील आर्मरेस्ट आणि आरामदायी जागा दिली आहे. नवीन पिढीसाठी सहा आकर्षक रंग पर्याय दिले आहे. कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे, यामुळे दोन्ही टायरवर रायडरला जास्त पकड मिळते. बोलेरो निओ बाजारात ह्युंदाई व्हेन्यू, किया सोनेट, टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा यांना टक्कर देते.

Leave a Comment