mahavitaran job recruitment open नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी महावितरण विभागाने एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. महावितरण विभागात ८०० जागांसाठी बंपर भरती करण्यात येणार असून ज्यांना या क्षेत्रात नोकरी करायची आहे त्यांनी ही संधी सोडू नका. विभागातील विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाचे शुल्क किती असेल याची सविस्तर माहिती या लेखात तुम्हाला देत आहोत.
job opportunities रिक्त असलेल्या ८०० जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. यामध्ये कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता अशा विविध पदांचा समावेश आहे. भरतीचे अर्ज उपलब्ध झाले असून १९ एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. महावितरण विभागातील या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असून याबाबत महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahadiscom.in )सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कनिष्ट सहायक पदविका अभियंता पदासाठी ३० वर्षे, पदवीधर अभियंता पदासाठी ३५ वर्षे अशी वयोमर्यादा असून तुम्ही जर या वयाचे असाल तर तुम्हाला ही संधी मिळू शकते. अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने (online job) अर्ज करावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रूपये तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना २५० रूपये अर्जशुल्कासह जीएसटीशुल्क भरून अर्ज सादर करता येईल.
सध्या नोकरी मिळवण्यासाठी तरूणाई विविध क्षेत्रात प्रयत्न करत आहे. त्यामुळे महावितरण या सारख्या महत्वाच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांना दिलासा मिळाला आहे. सध्या जाहीर झालेल्या जागांची भरती महाराष्ट्रात होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात राहणारे तरूण तरूणी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.