Please wait..

मुंबई : ”राज्यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे मी यापूर्वीही माझं मत मांडलेलं आहे आणि आता जे काय सुरू आहे, गेली चार-पाच महिन्यांमध्ये जे काय आमचं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचं शिवसेना-भाजपा युतीचं सरकार काम करतय, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, धडकी भरली आहे की आता काय होणार पुढे? आणि सगळे जे काय प्रकार आहेत, ते त्यातूनच पुढे येत आहेत.” याशिवाय “छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांचे विचार मोडूनतोडून टाकणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का? सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि तडजोड केली. यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही.” असंही शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उचलून धरला असून काही दिवसांपासून भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका सुरू होती यावर शिंदेंनी चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे.

must read

Share.
Exit mobile version