Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Ganesh Festival: परदेशी पाहुण्यांनी लुटला विसर्जन मिरवणुकीचा आनंद

Ganesh Festival: पुणे: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक Pune Ganesh festival ही कायमच आकर्षणाचा भाग राहिलेला आहे. परदेशी नागरिक देखील या विसर्जन मिरवणुकीला भुलतात कोरोनानंतर covid गणेशोत्सव होत असताना यामध्ये मानाचा पहिला आणि ग्रामदैवत कसबा गणपतीच्या मिरवणुकीत परदेशी नागरिक सहभागी झाले. ते केवळ सहभागी झाले नाही तर, त्यात त्यांनी ढोल ताशाच्या तालावर झिम्मा फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला.

Loading...
Advertisement

रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड Rotary Club of Pune Sinhagad यांनी  मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये रोटरी युथ एक्सचेंज मध्ये २० हुन अधिक देशातून आलेल्या पाहुण्यांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. यावेळी परदेशी तरुण आणि तरुणींनी ढोल ताशावर एकच ठेका धरला तसेच अस्सल मराठी जिम्मा फुगडीचा आनंद लुटला. गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने आसमंत दणाणून ठेवले. या मिरवणूक सोहळ्यास रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल खास पनवेल वरून सपत्नीक उपस्तिथ होते. तसेच माजी प्रांतपाल पंकज शहा , आर वा ई  डायरेक्टर ३१३१ सौ शोभा नहार व टीम, मेम्बरशिप डायरेक्टर पंकज पटेल, सिंहगड रोडचे पदाधिकारी आर डी जाधव (सेक्रेटरी ), सुधीर दफ्तरदार,  शरद लागू, दीपक महाजन, मनीषा अधिकारी, विनय जोशी, सुनील जाधव , प्रभाकर वाबळे, नितीन चावरे, अजित आपटे, डॉ मनोज देशपांडे, विनायक गायकवाड, अनिता पंडित व आमच्या क्लब चे रोट्रॅक्ट क्लब चे पदाधिकारी अमन सिंग बिश्त , डॉ ऐश्वर्या येवलेकर, नेहा डोईफोडे, कुलकर्णी, ईश्वरी हाडे , वेदांत कुलकर्णी , आदित्य पाटील व मोठ्या संख्येने मेंबर्स उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply