मुंबई – या महिन्याच्या सुरुवातीला मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील मशिदींमध्ये लावलेले लाऊडस्पीकर काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर लाऊडस्पीकरचा वापर हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. यावरुनच पुन्हा एकदा शिवसेना ( Shiv Sena) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर (BJP) निशाणा साधला आहे
“माझ्या पक्षाच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की त्यांनी लाऊडस्पीकरच्या वापराबाबत राष्ट्रीय धोरण तयार करावे आणि ते आधी बिहार, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये लागू करावे,” असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
तसे झाल्यास महाराष्ट्र देशाचा कायदा पाळतो तसे महाराष्ट्र आपोआपच त्याचे पालन करेल, असे ते म्हणाले. भाजपवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, लाऊडस्पीकरच्या वापरावरून तुमच्या लोकांनी वाद निर्माण केला आहे, त्यामुळे राष्ट्रीय धोरणाची गरज आहे.
राज्यसभा सदस्य राऊत म्हणाले की, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये अद्याप लाऊडस्पीकर काढलेले नाहीत. केंद्र सरकारने गोहत्या बंदीचे धोरण तयार केले, परंतु ईशान्येकडील राज्ये आणि गोव्याला सूट दिली, कारण या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गोहत्या बंदीला विरोध केला होता, असे ते म्हणाले. याबाबत राष्ट्रीय धोरण कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. राऊत म्हणाले, लाऊडस्पीकरबाबत राष्ट्रीय धोरण बनवा आणि हिंमत असेल तर त्याची काटेकोर अंमलबजावणी करा.