Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्रे.. आणि म्हणून फक्त 35 मिनिटांत भारताची फुलराणी दुसऱ्या फेरीत पराभूत

 मुंबई –   भारताची स्टार शटलर सायना नेहवाल (Saina Nehwal) गुरुवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभूत झाली आहे. तिला  युवा शटलर मालविका बनसोडने (Malvika Bansod) लागोपाठच्या गेममध्ये २१-१७, २१-९ असे पराभूत केले.यासह सायना स्पर्धेमधून बाहेर झाली आहे. २००७ नंतर कोणत्याही देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सायनाला हरवणारी मालविका ही दुसरी भारतीय खेळाडू आहे. पीव्ही सिंधूने यापूर्वी अशी कामगिरी केली आहे. (In just 35 minutes, India’s Fullarani lost in the second round)
मालविकाने सायनाला ३५ मिनिटांत हरवले. पहिल्या गेममध्ये 31 वर्षीय सायना 7-5 अशी पिछाडीवर होती. मालविकाने आघाडी कायम ठेवत पहिला गेम  २१-१७  असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेममध्ये मालविकाने एकतर्फी विजय मिळवत सामना ३५ मिनिटांत संपवला. तर दुसरीकडे ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला आहे. नवी दिल्लीतील केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात तिने इरा शर्माचा २१-१०, २१-१० असा पराभव केला.
या स्पर्धेत कोरोनाचे सात रुग्ण आढळले आहेत. हे सर्व भारतीय खेळाडू आहेत. त्यात स्टार पुरुष शटलर्स किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, रितिका राहुल ठक्कर, त्रिशा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमन सिंघी आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे. BWF ने सांगितले की त्याची जागा घेतली जाणार नाही आणि त्याच्या विरोधी खेळाडूला वॉकओव्हर दिला जाईल. ही स्पर्धा HSBC BWF वर्ल्ड टूर सुपर 500 चा भाग आहे. विजेत्या खेळाडूला सुमारे 30 लाख रुपये मिळणार आहे. (In just 35 minutes, India’s Fullarani lost in the second round)
Advertisement

Leave a Reply