Take a fresh look at your lifestyle.

मन्या सुर्वे माहित्येय का? वास्तव नेमके काय आणि त्याचा शूटआउट नेमका कशासाठी?

गुन्हेगारी जगतामध्ये मन्या सुर्वे याचे नाव अनेकांच्या तोंडी आहे. काहीजण त्याला पहिला हिंदू डॉन म्हणून मानतात तर काहीजण अर्थातच गुन्हेगारीतल्या या दिवंगत बेताज बादशाहाला पाण्यात पाहतात. ज्याच्या त्याच्या माहिती आणि वाचल्यावर झालेल्या आकलनाचा हा मुद्दा आहे. मात्र, मन्या सुर्वे याचे नेमके वास्तव काय होते आणि नेमका कशासाठी मुंबई पोलिसांनी त्याचा शूटआउट केला हेही अनेकदा गॉसिपमध्ये येतेच. शूट आउट अॅट वडाळा या हिंदी चित्रपटातील ‘वास्तव’ आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा नातेवाईक म्हणूनही काहीवेळा तो चर्चेत राहिला आहे. मात्र, क्वोरा या ऑनलाईन प्रश्नोत्तरे वेबसाईटवर याबाबत झालेली चर्चा आणि त्यामुळे निर्माण होणारे वेगळे प्रश्नही दुर्लक्ष करण्याजोगे नाहीत. कारण, मन्या सुर्वे यांचा पुतण्या असलेल्या माजी निवृत्त अधिकारी (भारतीय राजस्व विभाग 1974-2013) यांनी मांडलेले ‘वास्तव’ विचार करायला लावणारे आहे. तसेच त्यावरील प्रश्नोत्तरेही वेगळा विचार करायला नक्कीच भाग पडतात.

Advertisement

विश्वास सुर्वे लिहितात की, “माझे नाव विश्वास सुर्वे. मी निवृत्त आय आर एस अधिकारी आहे आणि कै. मनोहर सुर्वेंचा एकाच घरात वाढलेला पुतण्या आहे. श्री नाना पाटेकर हे माझ्या माहितीनुसार आमच्या नात्यातले नाहीत. मी अजुनही आगर बाजारात रहातो. माझी काकी 2014 साली स्वर्गवासी झाली. मनोहर सुर्वेंची दोन मुले, एक मुलगा आणि एक मुलगी उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ असून मुलगा परदेशी स्थायिक झालेला आहे तर मुलगी तिच्या आणि तिच्या पतीच्या कामाच्या स्वरुपामुळे काही दिवस भारतात तर काही दिवस परदेशात असते. वर दिलेले फोटो खोटे असून त्यात माझ्या काकांचा समावेश नाही. आमचे सर्व कुटुंबीय उच्चशिक्षित आहे. माझ्या दोन मुलीदेखील परदेशात स्थायिक झालेल्या आहेत. एक चित्रपट शूटआऊट ऍट वडाळा, जो माझ्या काकांवर आला होता तो 99 टक्के खोटा होता. एका चांगल्या सुसंस्कृत आणि शिक्षित मुलाला सर्वस्वी खोट्या केसमध्ये गुंतवून पोलिसांनी 27 डिसेंबर रोजी अटक केली. एक खोटा माफीचा साक्षीदार उभा केला आणि मेंटेनन्स ऑफ सिक्युरिटी ऍक्टखाली माझ्या दोन्ही काकांना तुरुंगात डांबले. आणि ज्या माणसाला उभ्या आयुष्यात कधी बघितलंही नाही, ओळखही नाही आणि ज्याच कधी नावही ऐकलं नाही, अशा माणसांच्या खुनाबद्दल 5 जानेवारी 1970 रोजी दोन्ही काकांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पोलिसांनी दिवसाढवळ्या केलेल्या माझ्या काकांच्या खूनाला कित्येक चक्षुर्वसत्यम साक्षीदार आहेत आणि त्यामध्ये राज्यसभेचे माजी खासदार आणि महाराष्ट्र टाइम्स चे माजी संपादक श्री भारतकुमार राऊत ह्यांचा देखील समावेश आहे. ह्याच स्तंभामध्ये वर कोणी एक उपसंपदकाने दिलेली माहिती धडधडीत खोटी आहे. अशा प्रव्रुत्तीच्या लोकांना मी विनंती करतो की मन्या‌ सुर्वे‌ हा माणूस आयुष्यभर अन्यायात होरपळला. आता त्याच्या निधनानंतर तरी त्यांच्यावर अन्याय करु नका. तुम्हाला ह्या व्यक्तिबद्ल काही लिहायचे असेल तर संपूर्ण माहिती जमा करा. आत्तापर्यंत Public domain मध्ये‌ जी काही माहिती आहे ती 90 टक्के खोटी आहे. आम्हा कुटुंबीयांना पण काही भावना आहेत ह्याची जाणीव असू द्या.”

Advertisement

विश्वास सुर्वे यांच्या लेखनास उत्तर देताना दीपक राउत यांनी म्हटलेय की, “नमस्कार, हे उत्तर आज वाचनात आले. मी किर्ती कॉलेज समोर रहायचो , साठी पर्यंत वास्तव्य तेथेच होते (नामोल्लेख करत नाही पण आपले काही कॉमन मित्रसुद्धा आहेत) स्व. मनोहरजीना खुपवेळा भेटलो सुद्धा आहे., आपण लिहिलेला शब्द न शब्द सत्य आहे हे मी जाणतो.. काही मंडळींच्या “घृणास्पद खेळींमुळे” स्व. मनोहर सुर्वेंची ओळख “काही वेगळीच” करुन देण्याची चाल खेळली गेली आणि काही प्रमाणात ती सफलही झाली , अलिकडेच मटा मधे “गुन्हेगारी विषयक” एका सदरामधे “वडाळा” एन्काउंटरचे वर्णन वाचनात आले त्याचवेळी मी माझी पत्नी आणि काही मित्रमंडळीना हे वर्णन “अतिरंजित” असल्याचे सांगितले होते. असो.. अशाप्रकारची “इतिहास उजळणी” आपणास आणि आपल्या कुटुंबास अत्यंत क्लेशदायक ठरत असेल याची जाणिव आहे म्हणून हा लेखन प्रपंच.. आपणास शुभेच्छा…” यावर विश्वास सुर्वे यांनी लिहिलेय की, “खूप खूप धन्यवाद. आपण तेव्हा त्याच भागात रहात असल्याने तुम्हाला बरीच माहिती आहे. राजकारणी काय आणि त्यांनी कथित पणे पदरी ठेवलेले अधिकारी काय हे पूर्वीपासून चालत आलेले आहे आणि ह्याचे यथार्थ दर्शन सध्या समस्त जनतेला होत आहे. सगळंच अगदी घृणास्पद आहे. सत्तेच्या आणि पदाच्या गुर्मीत कुटूंबेच्या कुटूंबे उध्वस्त करताना ह्याना काहीच वाटत नाही. मटाला खरी वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर त्यानी मला जरूर भेटावे. माझ्या काकांच्या खुनाबद्दल तर त्यांचे माजी संपादक भारतकुमार राऊत च प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यानी बसमधून सगळा प्रकार अगदी जवळून पाहीला आहे आणि त्यांनी तसे स्वतः जानेवारी १९८२ च्या मटाच्या एका अंकात अगदी पुढील पानावर सादर केलेले आहे. आमची पुढील पिढी, अगदी सगळेच उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ असून ह्या बजबजपुरी पासून खूप लांब परदेशात स्थायिक झालेले आहेत. आपला देश खूप चांगला आणि प्रगतिपथावर जरी असला तरी दलदलीने सुद्धा भरलेला आहे ह्याचे खूप वाईट वाटते.”

Advertisement

पूर्वीच्या दैनिक सकाळ नाशिकमध्ये वरिष्ठ उपसंपादक राहिलेल्या मनोहर यांनी यावर लिहिलेले आहे की, “मन्या म्हणजे मनोहर अर्जुन सुर्वे. हा बीए पास होता. डिस्टिंक्शन मध्ये. हॅडली चेस च्या कादंबर्‍या वाचायचा याला नाद. स्वत: गुन्हे करतानाही तो चेसच्या कादंबर्‍यांमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लॅनिंग करायचा. त्याचे शरीर कमावलेले होते. तो सतत हत्यारे – पिस्तूल, सुरा – बाळगून तर असायचाच, पण हँड बॉम आणि अ‍ॅसिडही सोबत बाळगायचा. दहा वर्षे फरारच असल्यामुळे तो ही सावधगिरी कायम बाळगायचा. त्याचे पोलीसांशी साटेलोटे कधीच नव्हते. ६९ साली अटक, आणि ८२ साली एन्काउंटर एवढाच त्याचा पोलीसांशी प्रत्यक्ष सामना. हा अतिशय गरम डोक्याचा होता. कुणी “नाही” म्हटले की झाला याचा शत्रू. अगदी किचनपर्यंत घरोबा असलेल्या कॉलेजपासूनच्या मित्रालाही याने पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या होत्या.” तर, आशिष माळी यांनी काही फोटो टाकून लिहिले आहे की, “प्रसिद्ध अभिनेते पाटेकर यांचा मामे भाऊ ,मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे . भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला एनकाऊंटर मध्ये मन्या सुर्वे खात्मा झाला . शूट आउट एट वडालाह्या चित्रपट मध्ये जॉन अब्राहमनि मन्या सुर्वे ची भूमिका पार पाडली .दाऊद च्या भावाला म्हणजे शब्बीर ला मारून त्याने मुंबईत दबदबा निर्माण केला. एकेकाळची पठाणाची हुकूमत याने कमी केली.अस बोलतात की दाऊद याच्या एन्काऊंटर पाठीमागे होता. दादरमधील कीर्ती कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलेल्या मन्या ने 80 दशकात मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वात वर्चस्व निर्माण केला होता. दाऊद इब्राहिमला आव्हान देणारा डॉन म्हणून मन्या सुर्वेची ओळखतात काही लोक त्याला हिंदू डॉन पण म्हणतात. मनोहर अर्जुन सुर्वे ला 11 जानेवारी, 1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी 1:30 मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो इकडे मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. एका खुनाच्या खटल्यात त्याला जन्मठेप झाली होती. पण तो येरवडा कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी झाला. आणि तेथून त्याच्या गुन्हेगारी जीवनाची खरी सुरुवात झाली. मन्याचा जन्म 1944 मध्ये रत्नागिरी इथला . त्याच्या आईने दुसरे लग्न केलेलं . सावत्र वडिलासोबत राहत होता. मन्या सुर्वेने आपली पहिली सुपारी घेतली १९६९ घडविली. दाउदचा भाऊ इब्राहीम कासकर याचा खून पण मन्यानेच केला होता. या हत्येनंतर मन्या व त्याच्या भावाला जन्ठेपेची शिक्षा झाली आणि तो येरवड्यात गेला .येरवड्यात त्याने भटकळ गॅंग सोबत पटले नाही . मग त्याला रत्नागिरी मध्ये पाठवला . असा म्हणतात कि मन्याला दाऊद घाबरायचं.”

Advertisement

“मन्या सुर्वे एक सुशिक्षित व हुशार विद्यार्थी होता. त्या काळात त्याला पदवी परीक्षेत ७८ टक्के गुण मिळाले होते. पण त्याचा मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात गेला व मन्या त्याच्या या स्वभावामुळे या क्षेत्राकडे आला आणि लवकरच अंडरवर्ल्डचा डॉन झाला. त्या काळात संपूर्ण मुंबईत मण्याची दहशत होती. त्याचा एन्काउनटर मूळचे बारामतीचे एसपी इसाक बागबान . ते ८३ च्या पोलीस च्या batch मधील होते . 1983च्या बॅचला ‘किलर बॅच’ म्हटलंय. या बॅचनं मुंबईतील गुन्हेगारी विश्वा संपवली . त्यात रवींद्र आंग्रे प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, अस्लम मोमीन हे सर्व होते . तो काळ होता तो दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी अमर नाईक यांच्या गँगवार चालायचे त्या एका एन्काऊंटर नंतर मुंबई मध्ये एन्काऊंटर ची लाट आली . बागवान यांनी मन्या सुर्वेला मारले लगेच राजेंद्र काटधरेंनी रमा नाईकला , इमॅन्युअल अमोलिक यांनी मेहमूद कालिया यांना संपवले . १९९९ नंतर गँगवार कमीच झालं, दाऊद, छोटा राजनसारखे अनेकजण परदेशात पळून गेले होते,” असाही दावा आशिष माळी यांनी यावर केलेला आहे.

Advertisement

*(सदरची माहिती ही फक्त जगात चर्चा नेमकी काय चालू आहे, हे सांगण्याचा प्रयत्न आहे. याबाबत आपलेही इतर काही मत असल्यास इथे किंवा थेट http://www.mr.quora.com/manya-surve-kona-hota क्वोरा वेबसाईटवर जाऊन आपण मत मांडावे.)  (1) मन्या सुर्वे कोण होता? – Quora

Advertisement
Advertisement

Leave a Reply