Take a fresh look at your lifestyle.

नगर जिल्ह्यात तीन घटनांमध्ये सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनांबाबत वाचा..

अहमदनगर : जिल्ह्यातील राहुरी, कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये घडलेल्या तीन घटनांमध्ये सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. राहुरीतील गणपती घाट परिसरातील मुळा नदीत दोन सख्खे भाऊ वाहून गेले, तर ओढ्यात मासे पकडण्यासाठी गेलेले दाम्पत्य वाहून गेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली. कोपरगावातील मुर्शदपूर गावात बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाला.

Advertisement

राहुरीतील अमर चंद्रकांत पगारे (वय 15), सुमित चंद्रकांत पगारे (वय 12) हे दोघे, श्रीरामपुरातील मंजाबापू भागवत गायकवाड (वय 45), चंद्रकला मंजाबापू गायकवाड (वय 40) हे वाहून गेले असून, कोपरगावातील संजय मारुती मोरे (वय 35) व मुलगा सचिन संजय मोरे (वय 15) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Advertisement

राहुरीत सख्खे भाऊ बुडाले
राहुरी तालुक्यातील लोहार गल्ली परिसरात राहणारे अमर पगारे, सुमित पगारे, समीर सचिन खंडागळे, शाहीर सचिन खंडागळे, रेहान शेख हे पाच मित्र दुथडी भरून वाहणाऱ्या मुळा नदीत पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, सुमित अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. ते पाहून मोठा भाऊ अमरने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही पाण्याबरोबर वाहून गेले.

Advertisement

पंकज नारद, उत्तम आहेर, शाहरूख शेख, सिद्धार्थ करडक यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो व्यर्थ ठरला. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी धाव घेतली. मुळा नदीच्या पाण्याचा विसर्ग मोठा असल्याने सायंकाळपर्यंत दोघांचा शोध लागला नव्हता.

Advertisement

श्रीरामपुरात दाम्पत्य बुडाले
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी परिसरातील सोमवारी (ता.4) रात्रभर अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ओढ्या-नाल्यांना पूर आलेला आहे. माळेवाडी येथील मंजाबापू गायकवाड हे पत्नी चंद्रकला यांच्यासमवेत मासे पकडण्यासाठी एका ओढ्यावर गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. पाण्यात शोध घेताना चंद्रकला यांचा मृतदेह सापडला. रात्री उशिरापर्यंत मंजाबापू यांचा शोध घेतला जात होता.

Advertisement

कोपरगावात बाप-लेकाचा मृत्यू
कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूरजवळील गांजेवाडी येथील मंडपी नाल्यात सचिन मोरे बुडाला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील संजय मोरे, ओम मोरे व शुभम पवार यांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, संजय व सचिन या बाप-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओम व शुभम हे दोघे वाचले आहेत.

Advertisement

तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले होते. स्थानिकांनी बाप-लेकाचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

Advertisement

मोदी सरकारचा पुन्हा सामान्यांच्या खिशात हात.. जून्या वाहनांच्या नोंदणीसाठी घेतला मोठा निर्णय..
कपाशीच्या नव्या जातीचा शोध, त्याचा उपयोग पाहून तोंडात बोटे घालाल.. वाचा तर खरं..

Advertisement
Advertisement

Leave a Reply