Take a fresh look at your lifestyle.

त्या प्रकरणावर फडणवीस हळहळले; तर राऊत विरोधकांवर भडकले…वाचा नेमकं कारण

ण्यात घडलेल्या निर्दयी सामुहिक बलात्कारानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र त्यानंतर बलात्कारांची सुरू झालेली मालिका थांबण्याचं नाव घेत नाही.

मुंबई : राज्यात भाजप शिवसेनेत चांगलेच वाक् युध्द रंगले आहे. भाजपा नेत्यांच्या चुकांवरून भाजपाला घेरण्याची एकही संधी महाविकास आघाडीतील नेते सोडत नाहीत. तर राज्यात घडलेल्या घटनांवरून महाविकास आघाडीला घेरण्याची संधी भाजप नेतेही अजिबात सोडत नाहीत.

Advertisement

पुण्यात घडलेल्या निर्दयी सामुहिक बलात्कारानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र त्यानंतर बलात्कारांची सुरू झालेली मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. मुंबईतील साकीनाका येथे मन सुन्न करणारा पाशवी बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. त्यावरून राज्यात राजकीय वातावरण पुन्हा गरम व्हायला सुरूवात झाली.

Advertisement

मुंबईतील साकीनाका येथील घटनेवर भाजपाने ठाकरे सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यातच साकीनाका येथे घडलेल्या प्रकरणातील पीडीतेचा मृत्यू झाल्याने भाजपा अधिक आक्रमक झाली आहे. तर राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस त्या प्रकरणावर हळहळ व्यक्त करत म्हटले की, साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर त्या पीडीतेचा मृत्यू मन सुन्न करणआरा आहे. ही माणसं इतकी पाशवी कशी असू शकतात? असा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना आहेत, असं फडणवीस म्हणाले.

Advertisement

साकीनाका प्रकरणानंतर भाजपाने राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारची गोची केली. या प्रकरणात प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटले की,  साकीनाका घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला. मात्र या घटनेचं राजकारण करणे म्हणजे पीडीतेच्या टाळूवरचं लोणी खाणं आहे, अशा शब्दात राऊत यांनी संताप व्यक्त केला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply