Take a fresh look at your lifestyle.

पत्रकरांना धक्काबुक्की; फडणवीस संतापले…वाचा नेमकं काय घडलं…

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की करत धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेे. त्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. 

मुंबई : यंदा सरकारने गणेशोत्सवासाठी निर्बंध जारी केले आहेत. तरीही गणपतीचं आगमन उत्साहात होताना दिसत आहे. मानाचा गणपती असलेल्या लालबागच्या राजाचेही आगमन झाले आहे. मात्र पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीने या उत्साहावर विरजण पडले.

Advertisement

पत्रकारांना लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हटले जाते. पत्रकार नियमांच्या चौकटीत राहुन आपलं काम करत होते. पत्रकारांकडे अधिकृत पासही होते. मात्र लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की करत धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेे. त्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

Advertisement

त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच फडणवीस पुढे म्हणाले की, तो व्हिडीओ मी स्वतः पाहिला आहे. त्यात हातच काय, पायही तोडू अशा प्रकारची भाषा पोलिस वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना वापरताना दिसत आहेत. हे वर्तन अत्यंत चुकीचे आहे. कारण तिथे गर्दी झाली होती, असंही काही नाही. मग एवढी दंडूकेशाही का? तसेच कोणी या दंडुकेशाहीच्या जीवावर कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असेल तर ते बरे नाही, असे म्हणत संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांनी केली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply