Take a fresh look at your lifestyle.

बाईने फेकलेल्या जाळ्यात अडकला रेक्टर, आणि लागला तब्बल इतक्या लाखांना चूना, वाचा काय आहे प्रकरण..

औरंगाबाद येथील समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त रेक्टर असलेल्या श्यामलाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2019 फेसबुकवर स्नेहा जाधव नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर रेक्टरची आणि त्या महिलेच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यांनी व्हॉट्सअॅपवर चॅटींग करायला सुरूवात केली. 

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांत हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मैत्री करून अनेकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जातो. सायबर पोलिसांनी अनेक वेळा याबद्दल सुचित केल्यानंतरही अनेक नागरीक यामध्ये अडकत आहेत, असाच प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

Advertisement

औरंगाबाद येथील समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त रेक्टर असलेल्या श्यामलाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2019 फेसबुकवर स्नेहा जाधव नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर रेक्टरची आणि त्या महिलेच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यांनी व्हॉट्सअॅपवर चॅटींग करायला सुरूवात केली.

Advertisement

एप्रिल 2020 मध्ये स्नेहा जाधवने श्यामलालकडे मुलगी आजारी असल्याचे कारण सांगून चार हजार रूपयांची मागणी केली.  ते श्यामलाल यांनी दिले मात्र जानेवारी महिन्यात ते परतही केले. पुढे जालन्यातील सासऱ्यांच्या नावे निशा कॉम्पेक्स आहे. ते माझ्या व जावयाच्या नावावर करायचे आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत अशी थाप मारली. पुढे अशाच प्रकारची कारणे सांगत महाराष्ट्र बँकेच्या (Maharashtra Bank) खात्यात 8 लाख 36 हजार रूपये आणि स्टेट बँक (State Bank Of India) च्या खात्यात  आणखी 9 लाख 28 हजार रुपये टाकण्यास सांगितले. त्यामुळे सुमारे 17 लाख 64 हजार रुपये श्यामलाल याने स्नेहाला दिले. पण तरीही स्नेहा सतत पैशांची मागणी करतच होती. पण वारंवार पैशाची मागणी केल्याने श्यामलाल यांनी त्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. मात्र पैसे न दिल्यास तुमचा मुलगा आणि जावयाला गोळ्या घालण्याची धमकी श्यामलाल यांना देण्यात आली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे श्यामलाल यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. मात्र तोपर्यंत रिटायर्ड रेक्टर असलेल्या श्यामलाल यांना तब्बल 19 लाख 14 हजार रूपयांचा चूना लागला होता.

Advertisement

श्यामलाल यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर औरंगाबाद सायबर पोलिसांनी (Aurangabad Cyber Police) या प्रकरणात जालना येथील तीन आरोपींना अटक केली. त्यात महिलेच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट उघडून फेसबुकवर मैत्री करण्यातून 19 लाख 14 हजार रूपयांना गंडा घालणारे विजय तुळजाराम मुंगसे, सय्यद अन्सार सय्यद अख्तर आणि संतोष विष्णू शिंदे पुरूष असल्याचे उघडकीस आले.

Advertisement

श्यामलाल यांनी  सायबर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक (PI) गौतम पातारे, उपनिरीक्षक (PSI) राहुल चव्हाण, पोलिस कर्मचारी धुडकू खरे, सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, मन्सूर शहा, विजय घुगे, अमोल सोनटक्के आणि छाया लांडगे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींचा शोध घेतला.  तर या तपासात हाती आलेली माहिती पोलिसांना चक्रावणारी होती. कारण स्नेहा नावाच्या महिलेच्या नावाखाली जालन्यातील तीन पुरुषांनी चौधरी यांची ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.

Advertisement

या तीन आरोपींमधील एकजण किराणा दुकानदार, दुसरा रिक्षाचालक आणि तिसरा विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले.  तर विजय तुळजाराम मुंगसे, सय्यद अन्सार सय्यद अख्तर आणि संतोष विष्णू शिंदे या तीघांनी स्नेहा जाधव यांच्या नावावर फेसबुकवर बनावट अकाउंट काढले होते. तसेच श्यामलाल यांचा मोबाइल नंबर घेऊन  या तीघांनी त्यांच्याशी व्हॉट्सअपवर स्नेहा म्हणूनच चॅटिंग केल्याचे तपासात उघड झाले. मात्र या प्रकरणात आणखी कुणाचा सामावेश आहे का, याचा तपास सुरु असून 4 सप्टेंबरपर्यंत तीनही आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Advertisement
त्यामुळे नागरीकांनी अनोळखी नावाने फेसबुकवर असलेल्या रिक्वेस्ट स्वीकारू नयेत, तसेच अनोळखी व्यक्तींशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Advertisement

Leave a Reply