Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई : सध्या राज्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला सरकारने परवानगी द्यावी यासाठी भाजप आणि मनसेने राज्य सरकारवर जोरदार टिका केली. तसंच लसीकरणात असलेल्या त्रुटीही राज्य सरकारला दाखवून दिल्या आहेत.
मनसेने कोरोना प्रतिबंधक निर्बंध झुगारून काल दहीहंडी उत्सव साजरा केला होता. तर यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सणांवर निर्बंध आणणाऱ्या सरकारवरही टिका केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरीकांचे जीव धोक्यात घालणारे कार्यक्रम कोणीही आयोजित करणे दुर्दैवी आहे. त्या ऐवजी कोरोनाविरोधात आंदोलन करण्याची गरज आहे, असे म्हटले होते. त्यावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना (Raju patil React on Uddhav Thakary) उत्तर दिलं.
मनसे आमदार राजू पाटील यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. राजू पाटील म्हणाले की, काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की, आंदोलन करायचे झाले तर ते कोरोना संपवण्यासाठी करा. अहो आम्ही ते ही करतो. पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला?, एकाला ईडीची (ED)नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही, अशी खोचक टीका पाटील यांनी केली.
राजू पाटील म्हणाले की, ‘दुसरी लाट आली तेव्हाच लसीकरणाचं केंद्र उभारण्यास आम्ही सुरुवात केली. तेव्हा महापालिका आयुक्तांना भेटून सांगितलं होतं की, आम्हाला चार- पाच लसीकरण केंद्रे उभारायची आहेत. त्यासाठी परवानगी द्या, तुमच्या लसी येतील, त्या लोकांना मोफत टोचून देऊ. महापालिकेचाही खर्च होणार नाही. पण आयुक्तांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर १६ जानेवारीला लसीकरणाच्या सुरू झालेल्या कार्यक्रमात पालिकेने एकूण अडीच ते पावणे तीन लाख डोस दिले आहेत. त्यामधील रोजची सरासरी काढली तर १५०० आहे. एवढ्या हळूहळू लसीकरण होणार असेल तर पूर्ण कल्याण डोंबिवलीचे लसीकरण व्हायला दोन वर्ष लागतील, याकडे राजू पाटील यांनी लक्ष वेधले.
Advertisement